काव्योत्सव २
सूर्य सूक्त
दिवाकरा वसुंधरा तुझ्याचभोवती फिरे
किरणस्पर्श रे तुझा झळाळवी तिचे हिरे
प्रभात या जगात रे तुझेच हात आणती
दुपारच्या तुझ्या उन्हात वादळे दणाणती
सांजही तशी तुझ्यामुळेच होइ भास्करा
त्रिकाल वृक्ष-वेलि-जीव जगवुनी धरे धरा
अस्त, भास्करा तुझा, समस्त अंधकारतो
उदय, दिनमणी तुझा, क्षणात तम निवारतो
तुझेच तेज पांघरून तोषवी शशी इला
तुझा प्रकाश प्राशुनीच उमलवी कळी फुला
महान तू सवितृ, नत तुझ्यासमोर शीर्ष हे
ओंजळीतुनी करी तुला प्रदान अर्घ्य, घे
-मुकुंद कर्णिक