#Kavyotsav2
दिवस अपुले ते काहीसे निराळेच होते....
कधी नारळ तर कधी शहाळेच होते...
क्षण ते तुझ्या माझ्या सोबतीचे फुलफळांचे मळे होते...
दिवस अपुले ते कधी नारळ तर कधी शहाळेच होते.....
आज आहेत तुझ्याकडे जे,
धूर्त आलिंगणाचे अजगरी विळखे,
गळ्यात तुझ्या एकेकाळी हात माझे,
प्रेमाच्या मिठीचे सुमनमाळ होते....
दिवस अपुले ते कधी नारळ तर कधी शहाळेच होते....
आठवणींची पानं उलटून बघ एकदा तू,
आज तुझ्या आठवणीत असणारे
कधी तुझ्यातच वसणारे होते...
आज आहेत तूझ्या सोबती जे,
ते आहेत तसेच पूर्वी ही टोचणारे सुळे होते....
दिवस अपुले ते कधी नारळ तर कधी शहाळेच होते....
नीट बघ जरा, नजर स्वच्छ कर....
मेंदूला गदगदा हलवून, हृदय ही जागे कर....
घोंघावणाऱ्या ज्या माशा आहेत आज तुझ्या अवतीभवती....
यापूर्वी तेच प्राणी तुझ्या - माझ्यावर जळणारे होते...
दिवस अपुले ते कधी नारळ तर कधी शहाळेच होते....
सहजच गळत होते मध ज्यातून कधी कधी....
ओंजळीत ते आपण गोळा केले,
कसे विसरलो आपण त्याच्या गोडापुढे,
ते चावणाऱ्या मधमाशांचे पोळेच होते....
दिवस अपुले ते कधी नारळ तर कधी शहाळेच होते.....
सुविधा....?