Marathi Quote in Blog by HARSHU

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#LoveYouMummy


माझ्या प्रिय आई,
तुझ्यावर काही लिखाण करणे म्हणजे, शब्दांत न मांडता येणारी एक भावना आहे. तरीही तुझ्याबद्दल काही तरी लिहावेसे वाटतेच कारण आपल्या प्रिय गोष्टीवरच कवीची कविता आणि लेखकाची लेखणी धावत असते. तुझी आठवण नाही येणार असा एकही दिवस नाही, तुझ्यापासून दूर असलो तर जीव घुटमलाय लागतो. रोज फोनवर बोलणे चालू असले तरी तो फोन कॉल कधीच न संपावा असे वाटते. बोलायला काही नसले तरी फक्त कानाला फोन लावून धरावा असे वाटते. कारण मी तुझ्यापासून होतो, या जगात फक्त तुझे माझे नातेच एका नाळेने जोडलेले आहे आणि ही नाळ जोडलेल नातं अगदी परमेश्वरापेक्षाही कितीतरी पटीने श्रेष्ठ असते. जर कुणी विचारले तुझी शेवटची ल इच्छा काय तर मी फक्त इतकेच मागेन की माझा शेवटचा श्वास हा माझ्या आईच्या कुशीत असतांना घ्यावा. तो एक असा काळ राहील जेव्हा हा वेळ ही थांबेल.

अजून बरेच काही लिहायचे आहे गं तुझ्याबद्दल पण जितकी तुझी आठवण येईल तितकी माझ्या या हृदयाला यातना होतील....

तुझाच हर्षु

Marathi Blog by HARSHU : 111041849
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now