Marathi Quote in Blog by Dr Vithal sonbaji sonale

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

वेड का लागले तुला ।
दूर दूर सोडून चालला आई बापाला।
एवढा एकटा का झाला रे माणसा ।
एकदा आठव त्या वेड्या आईची माया।
तू पोटात असताना उपवास तिने केला।
तुला त्रास होऊ नये म्हणून तिच्या सुखाचा त्याग तिने दिला।
एवढा पोरखा कसा रे तू झाला माणसा।।
ज्याला आज तू वेडा मानतो जरा आठव त्या बापाला।
तुझ्यासाठी त्याने मरे पर्यन्त फक्त उचलला रे कष्टाचा बेडा।
जेव्हा हि तू हट्ट रे केला काहीही करून त्याने तुझा हट्ट तो पुरवला।
मनातल्या मनात रुजत राहणारा तो बाप आज तुझ्यासाठी वेडा कसा रे झाला ।
आजच्या काळात तू एवढा व्यस्त झाला आई बापा साठी वेळ तुला मिळेना।
आज ही तुझ्या सोबत जेवायची इच्छा रे असते त्यांना।
पण काय माहित त्या वेड्या आईला
कि तुझे जेवण हि इंटरनेट तुला दयायला।
हे विसरू नको रे मानसा ते वेडे आईबापच आहे ।
ज्यांचा आखरी ठोका सुद्धा आपले नाव घेऊनच संपतो।
जरा जप रे तू मानसा आपल्या आईबापाला।
कारण ते दोन असे बगीच्यातली फुले आहेत।
जे चिमले तरी सुगंद्ध कधीही सोडत नाहीत।
असा एकटा काधिहि एकटा होऊ नको रे माणसा।
जरा जप रे आपल्या आई बापाला।

Marathi Blog by Dr Vithal sonbaji sonale : 111041027
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now