कधीतरी एकट्यानेच प्रवास करावा. कधी रस्ता चुकेल..कधी अनोळखी वळणावर धक्के बसतील.. कधी पाकीट हरवेल..कधी अगदीच एकाकी वाटेल..असंख्य अनुभव येतील पण हाच प्रवास जगण श्रिमंत करुन जातो. खुपकाही शिकायला मिळंत. निसर्गाच्या खाणीतुन पाझंरत असतं सतत काहीतरी.. मग त्यातलाच एखादा थेंब आपल्या ओंजळीत स्थिरावतो..आणि आपल्याला गवसतं काहीतरी खास..मौल्यवान..जे जगाच्या नजरेतुन सुटुन आपल्या पर्यंत आलेल असतं..फक्त आपल्यासाठी..!
- साधना वालचंद कस्पटे ©?