Marathi Quote in Shayri by Dipaali Pralhad

Shayri quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#Kavyotsav

नाती भावना
पहिल्यांदाच मी इतके
निवांत डोळे मिटले होते
बाकी सर्व जागी जे होते ,
सख्खे चुलत मित्र मैत्रिणी
सगेसोयरे , नातलग
सर्वच शब्दांचे गोड होते ,
ऊठ ऊठ म्हणत मला
रडून रडून उठवत होते
अन मी सुटकेचा दुःखद
पण सुखदसा श्वास सोडून
निपचित भुईधार होते ,
अरे किती वेळ असे
मला धरून बसणार
वेशी बाहेरच्या त्या चौकटीत
मला सोडून यावंच लागणार ,
रडता रडता बोलत होते
माझं कोडकौतुक हंबरडा
फोडून शब्दात गात होते ,
जिवंतपणी आस होती
दोन मायेच्या शब्दांची
तेव्हाच दिले असते प्रेम
तर आज डोळ्यात यांच्या
दाटून आल्या नसत्या
घळाघळा धारा आसवांच्या ,
कुणाचा तरी आवाज आला
तयारी करावी लागेल
मीही समजले होते कि
जित्यापणी जीव जळाला होता
आता फक्तच नश्वर देह राख होईल,
बारा तेरा दिवसाचं सुतक पाळतील
माझ्या आवडीनिवडी कटाक्षानं पाळतील
आणि आता हयात नसलेल्या माझ्या
जिवाच्या साऱ्याच हौस पुरवतील.
©दिपाली प्रल्हाद

Marathi Shayri by Dipaali Pralhad : 111033524
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now