||काळोखी रात्र ||
तू एक काळोखी रात्र,
विरह सहन करावा लागतो,
तुलाही त्या मधुर चंद्र चांदण्यांचा,
प्रखर किरणांच्या तेजापुढे काही काळ
तुलाही समेटून राहावे लागते ...
सूर्यास्तासाठी असतेच तू कातूर,
चंद्र चांदण्यांच्या मिलनास असतेस तू आतूर,
तू एक काळोखी रात्र .....
चंद्र चांदण्यांनी तू सजलेली,
रातराणीच्या सुगंधाने तू भरलेली,
किरकीर रात किड्यांच्या
मंत्रोच्चाराने तू मुग्ध झालेली,
तू एक काळोखी रात्र ......
तूच एक मात्र
देतेस थकलेल्या मनाला निद्रेची मात्रा
व पुन्हा करवतेस नव चैतन्यांची यात्रा
तू एक काळोखी रात्र.....