#Kavyotsav - प्रेम
"माझ्या मृत्युनंतर "
माझ्या मृत्यूनंतर..
अश्रू ढाळु नकोस..
उगाच मला इकडे तिकडे शोधु नकोस
असेन मी..
तुला स्पर्शुन जाणाऱ्या प्रत्येक गारव्यात..।।
असेन मी..
तुझ्यावर ओघळणार्या प्रत्येक थेंबात..।।
असेन मी..
तुझ्यापर्यंत पोहचणार्या पहील्या सूर्यकिरणात..।।
असेन मी..
तुला आवडणार्या गर्द थंडिच्या धुक्यात ..।।
असेन मी..
चहाच्या वाफेबरोबर रेडिओ वर रेंगाळणार्या एखाद्या जुन्या गाण्यात..।।
असेन मी..
आनंदाने आतुरतेने तु अंगावर झेलणार्या
शुभ्र बर्फाच्या प्रत्येक सुक्ष्म कणात..।।
असेन मी..
एखाद्या जीर्ण पुस्तकात
क्षीण होऊन झिजलेल्या फुलांच्या पाकळ्यात ..।।
असेन मी..
निरंतर .. क्षितिजाआड आणि पल्याड
प्रत्येक क्षणाला .. तुझी सावली बनुन
तुझ्याही नकळत .. तुझ्या हृदयात ..एक अंकुर बनुन .. प्रेमाचा .।।
- साधना वालचंद कस्पटे ©