#KAVYOTSAV
दुविधा मनाची...
अव्यक्त भावनांना व्यक्त करावे का..
कि मैत्रीच्या मर्यादेत तुला आजमावे मी...
नजरेत तुझ्या प्रतिबिंब माझे शोधावे का...
की थांबून थोडा काळ नियतीला संधी द्यावी मी..
माझे प्रत्येक स्वप्न तुझ्या सहवासामध्ये पहावे का...
की तुझ्या,माझ्या ध्येयपूर्तीची वाट पाहावी मी..
भविष्याकडे तुझा हात धरून वाटचाल करावी का..
की भूतकाळकडे मागे वळून पाहावे मी...
सर्वस्व माझे तुझ्यासाठी मी वहावे का...
की स्वत्व जपून स्वप्न पुर्तीला प्राधान्य द्यावे मी..
तुझ्या स्पर्शाने मोहरुन मी जावे का...
की तुला मोहरवणाऱ्या स्पर्शाला शोधावे मी...
तुझ्या स्वप्नामध्ये मी जगावे का...
की माझ्या स्वप्नांचा पाठलाग करावा मी...
तुझ्या बंधनात मी अडकावे का..
की स्वच्छनद होऊन भरारी मारावी मी..
तुझ्यासाठी अपूर्ण राहावे का..
की पूर्णत्वापर्यंत स्वतःला थांबवावे मी..
अव्यक्त त्या भावनांना व्यक्त करावे का.??
©kanchankk