Marathi Quote in Shayri by POONAM MALI

Shayri quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#Kavyotsav

सुन्या मैफीलीत

आठवु नको पुन्हा मला
एकटा तु असताना
रात्री वाटतील सुन्या-सुन्या
जीवन तुला जगताना

पुन्हा नव्याने उभ रहा
सा-या यातना सोसताना
मुरड घाल तुझ्या खचलेल्या मनाला
आठवु नको पुन्हा मला एकटा तु असताना

चुक तुझीही होती तशी माझीही
निर्णय तुझाही चुकला तसा माझाही
झाले - गेले विसरुन पुसुन टाक त्या खुणांना
आठवु नको पुन्हा मला एकटा तु असताना

इतका कठोर नाहीस तु
सहजा - सहजी सार विसरायला
पण कठोर थोड व्हाव लागेल
आव्हाने सारी पेलताना
आठवु नको पुन्हा मला एकटा तु असताना

- पूनम माळी

Marathi Shayri by POONAM MALI : 111032218
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now