Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🎯सोया मसूर कबाब🎯

थंडगार हवेत खमंग आणि चटपटीत 😋

🎯साहित्य

सोया बॉल (बाजारात मिळतात )साधारण वीस तुकडे
एक वाटी मसूर डाळ
अर्धी वाटी डाळीच पीठ

🎯(मी यात मुगाचे पीठ वापरलं आहे)
चिली 🌶️ फ्लेक्स
तिखट ,मीठ ,गरम मसाला ,तीळ, बडीशेप ,कांदा ,लिंबू , भाजलेली खसखस (माझ्याकडे भुवनेश्वर ची स्वस्तात मिळालेली 😊भरपूर खसखस आहे म्हणून वापरली आहे) कसुरी मेथी आवश्यकतेनुसार
वा आवडीनुसार ..
बारीक रवा

🎯कृती

मसूर डाळ रात्री भिजवुन ठेवावी
सकाळी सोया बॉल गरम पाण्यात टाकावे
दोन तासांनी ते बॉल खुप फुगतात ते हाताने दाबून पाणी काढून टाकावे
मसूर डाळ पाणी न घालता कोथींबीर व एक दोन मिरच्या घालून मिक्सर ला वाटून घ्यावी
त्यानंतर सोया बॉल पण वाटून घ्यावेत
आता दोन्ही एकत्र करावे
आवडी प्रमाणे तिखट ,मीठ , गरम मसाला ,कोथिंबीर ,हळद ,तीळ बडीशेप , खसखस, कसुरी मेथी,लिंबू रस घालावा

🎯मी यात दोन तीन खाउची पाने पण चिरून टाकते
(माझ्या घरी खाऊच्या पानांचा वेल आहे व जरी पाने पौष्टिक असली तरीही रोज पान खाणे शक्य होत नाही
म्हणुन मी अशा पदार्थात मुद्दाम घालते )

🎯आता त्यात अर्धी वाटी डाळीच पीठ घालून मिश्रण एकत्र करून घेणे
व पसरट कढईमध्ये मध्यम लांबट गोळे करून रव्यात घोळून तळून घ्यावेत.
मी येथे मुगाच्या रव्यात 🌶️ चिली फ्लेक्स घालून त्यात हे कबाब घोळून घेतलेत

🎯सॉस व कांदा रिंग सोबत सोबत घ्यावे .
खुप पौष्टिक असतात व अत्यंत चविष्ट लागतात . 😋😋

🎯भरपूर लोह व प्रथिने यांचा साठा असलेले हे कबाब आठवड्यातून दोनदा तरी खाण्यात असावेत .😊

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112032126
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now