🟨इडली_स्टाईल_ढोकळा. 😊
🟨 ढोकळा तर सर्वांना माहीत आहेच
फक्त तो इडली पात्रात उकडला
🟨 साहित्य
एक वाटी डाळीचे पीठ शक्यतो सुपरफाईन ...जे पॅकेट मध्ये मिळते
एक मोठा चमचा तांदूळ पिठी
पाव चमचा सोडा
दोन मिरच्या थोडे आले आणि कोथींबीर वाटण
मीठ साखर चवीप्रमाणे
फोडणी मोहरी हिंग तीळ
🟨 रात्री ताकात दोन्ही पिठे भिजवुन ठेवणे
🟨 सकाळी त्यात मीठ साखर मिरची आले कोथिंबीर याचे वाटण व पाव चमचा सोडा घालून चांगले फेसून मग वाफवावे
🟨 हा ढोकळा गार झाल्यावर
त्यावर हिंग ,मोहरी ,कढीलिंब, तीळ घातलेली फोडणी ओतावी
वरती बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी
🟨 टीप..
फोडणीचा गॅस बंद केल्यावर त्यात पाव वाटी पाणी घालावे व मगच ही फोडणी ढोकळ्या वर
ओतावी
म्हणजे ढोकळा कोरडा होत नाही