पावसाळ्याची सुरुवात..
गुलमोहोराचा फुलोरा आता हळू हळू गळू लागतो आहे
खुप मोठ्या पावसाच्या झडी सुरू झाल्या की तो धरणीला मिळणार आहे
आता गेलो तरी पुढील वर्षी येणार ही आस घेऊन तो निघाला आहे
संपूर्ण उन्हाळ्यात त्याने आपल्या डोळ्यांना थंडावा दिलाय
आपणही आनंदाने त्याला निरोपाचे विडे
द्यायला हवेत
पुन्हा परतून येण्यासाठी...