Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

केशर आंब्याचा स्लाइस केक
🥭 मँगो केक 🍪

हा केक केशर आंबा वापरून केला
आहे

🍁साहित्य
एक वाटी रवा
पाव वाटी मैदा
एक वाटी केशर आंब्यांचा रस
पाव वाटी बारीक साखर (आंब्याच्या गोडीच्या प्रमाणात)
या आंब्याचा रस पातळ परंतु गोड असतो
पाव चमचा सोडा
पाव चमचा बेकिंग पावडर
पाव वाटी अथवा दोन क्यूब बटर
टूटी फ्रुटी तूकडे

🍁कृती
प्रथम रवा व मैदा एकत्र करुन
त्यात बारीक केलेली साखर मिसळा
व घेतलेले बटर मिश्रणाला चोळून ठेवा
हे सर्व अर्धा तास झाकून ठेवा

🍁अर्ध्या तासाने त्यात आंब्याचा रस घालून
टूटी फ्रुटी तुकडे
सोडा व बेकिंग पावडर घालून
भरपूर फेसून घ्या

🍁मिश्रण हलके झाले की एका तूप लावलेल्या थाळीत अथवा टीन मध्ये ओतून
प्री हिट केलेल्या ओव्हन अथवा कुकर मध्ये नेहमीच्या केक सारखा भाजून घ्या

मंद आचेवर साधारण पंधरा मिनिटात तयार होतो
गार झाल्यावर स्लाइस मध्ये कापुन घ्या
आंब्याचा केशरी रंग केक मध्ये छान खुलतो...❤️

🍁केक चांगला हलका होतो ❤️

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112027177
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now