आंब्याचा बहारदार मौसम
त्यात घरच्या बागेतील दोन झाडांचे मुबलक मधुर आंबे...
मग काय....
रोज आंबा हवाच
सकाळी नाश्त्याला आंबा
संध्याकाळी काहीही खाल्ले तरी सोबत आंबा कापुन ..
दुपारच्या जेवणात
पोळी आमरस.
पुरी आमरस..
उकडीची पोळी आमरस..
आंब्याच सांदणे
मोदक आमरस
फुलके आमरस
आंब्याचा शिरा..
असे अनेक चविष्ट प्रकार....😋
🥭उकडीची पोळी आणि आमरस..
हा बेत आंब्याच्या सिझन मध्ये
चार पाच वेळेला होतोच
🥭प्रथम पोळीच्या कणकी प्रमाणे कणीक भिजवून घेणे
🥭तांदळाच्या पिठाची मोदकाच्या उकडी सारखी उकड काढून ती मळून घेऊन
गोळे तयार करावे
हे गोळे कणकीच्या पारी मध्ये भरून नेहेमी सारखी
पोळी लाटावी
तुपावर खरपूस भाजून घ्यावी..
🥭मी उकडीत थोडे केशर घातले आहे
त्यामुळे रंग ही आलाय
आणि मध्ये भरलेली उकड दिसते आहे
अतीशय चविष्ट प्रकार..😋