आतापर्यंत मी पन्नास गोष्टी लिहिल्या आहेत. मनात एक ध्यास आहे—या गोष्टी रंगमंचावर जगाव्यात. मराठी रंगभूमीवर त्यांचं नाटक व्हावं. शाळा–कॉलेजातल्या मुलांनी ते उचलून धरावं. पण अभिनयाला कसलीही तडजोड नको—अभिनय टोकदार, जिवंत असला पाहिजे. आणि हो—त्या नाटकांच्या छायाचित्रांचा, व्हिडीओचा ठसा मात्र जरूर राहिला पाहिजे.
डृष्टी थिएटर मंचातून एकदा गडकरी रंगायतनात नाटक सादर झालं होतं. त्यातला माझा एक छोटासा संवाद—दक्षिण भारतीय व्यक्तिरेखा होती. फक्त दोन शब्द—“भाभी, बोला बोला”—पण मनापासून केलेला! तेव्हा मनात आलं—हो, मी तुमच्यासोबत आहे.
मराठी रंगभूमी पोहोचली पाहिजे यशाच्या शिखरावर.
By
Fazal Abubakkar Esaf
Mee Marathi.....