सजवून पुनवेला रात्र रंगून गेली,
मिटताच डोळे स्पर्श हळुवार
प्रीत मोहरुन आली..
भिडले ओठास ओठ अन
सारी तनु थरथरली, ही रात्र मिलनाची
बहरून आज गेली..
तुझ्या मिठीत सजणा, विरघळे पाश सारे
हे वारे गुलाबी छेडून प्रीत गेले..
कळले मला न केव्हां सैल झाला विळखा
बिलगून घट्ट तुला, गोठली रात्र सारी..
आधार मिटला सारा, अन् पहाट झाली...