Quotes by Vrishali Gotkhindikar in Bitesapp read free

Vrishali Gotkhindikar

Vrishali Gotkhindikar

@jayvrishaligmailcom
(3.3k)

🩸कणकीचा शिरा

🩸साहित्य
एक वाटी कणीक
अर्धी वाटी तूप
पाऊण वाटी गूळ
वेलदोडे पुड
एक वाटी दुध
बदामाचे काप सजावटी साठी
🩸कृती
कणीक प्रथम मंद आचेवर कोरडीच गुलाबी सर खमंग भाजुन घ्यावी
कणीक भाजलेला वास येऊ लागला की
हळुहळु त्यात तूप घालत परत भाजत राहावे
आच मंद असावी
🩸एकीकडे एक वाटी पाणी व एक वाटी दुध एकत्र करून गरम करायला ठेवावे
तूप पुर्ण घालून झाले की दुध पाण्याचे गरम मिश्रण त्यावर हळुहळु ओतावे
कणकेची गुठळी होऊ देऊ नये
व त्यावर पाच मिनिटं झाकण ठेवावे
🩸पाच मिनिटांनी त्यात पाऊण वाटी गूळ घालावा
गुळ विरघळला जाईपर्यंत परत हलवत राहावे
व परत पाच मिनिटांसाठी झाकणं ठेवावे
शेवटी वेलदोडे पुड घालून एकत्र करावे

🩸सजावट बदामाचे काप

Read More

☀️तांदुळ पिठीची कडबोळी

अत्यंत कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारा खुसखुशीत सोपा प्रकार
ही कडबोळी चहा सोबत अथवा दह्यासोबत खायला छान लागतात

☀️साहित्य
एक वाटी तांदुळ पीठी
पाव वाटी लोणी
दोन मोठे चमचे ओले खोबरे
थोडे तीळ
हळद
काळी मिरी पावडर पाव चमचा
मीठ चवीनुसार

☀️कृती
प्रथम तांदुळ पीठी कढईत मंद आंचेवर हलकी भाजून घ्या
(यामुळे पीठी हलकी होते व पदार्थ चवदार होतो )
गार झाल्यावर याला पाव वाटी लोणी चांगले चोळून घ्या व
त्यात काळी मीरी पावडर, खोबरे तीळ, थोडी हळद, मीठ हे सर्व घालून मिसळून घ्या

☀️ पाणी थोडे कोमट करून त्या पाण्याने हे पीठ चांगले भिजवुन घ्या
व अर्धा तास झाकून ठेवा
अर्ध्या तासाने हे पीठ चांगले मळून घ्या
एक छोटा गोळा घेऊन पोळपाटावर त्याची लांबट वळकटी करा
☀️ याचे इंचभराचे छोटे तुकडे काढून हाताने गोलाकार करून दोन टोके जोडून घ्यावीत
अशा सर्व पिठाच्या गोलाकार कडबोळी तयार करून घ्याव्या
मंद आचेवर गरम तेलात तळून घ्यावेत
याला फोटोत दाखवली आहे तशी आतून चांगली चकली प्रमाणे नळी पडते
अत्यंत खुसखुशीत होतात
गार झाल्यावर भरुन ठेवाव्या
घट्ट झाकणाच्या डब्यात पंधरा दिवस या कडबोळी चांगल्या टिकतात

Read More

☘️बाजरीचे धिरडे

☘️ बाजरीच्या पीठाची चव थोडी कडसर असते
काही जणांना ती आवडत नाही
पण रोज आवडीने बाजरीची भाकरी सुध्दा बरेच लोक खातात.
प्रत्येकाची आवड असते...

☘️मी नेहेमी बाजरी ज्वारी मिसळून भाकरी करते.
कित्येक वेळा बाजरीचे पीठ आणले जाते पण वापर करायचा राहून जातो.
भोगीला बाजरीची भाकरी खायची असतें म्हणून पीठ आणले जाते.
त्या दिवशी वापर होतो
मग पीठ पडून राहते
काही दिवसांनी त्याची विरी जाते
भाकरी जमत नाहीत, तुटतात
अशा वेळी ही धिरडी करून पहा
चविष्ट होतात आणि पीठही वाया जात नाही

☘️साहित्य
दोन वाटी बाजरीचे पीठ
एक बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथींबीर
दोन मिरच्या बारीक चिरुन
हळद अर्धा चमचा
एक वाटी आंबट ताक
जीरे
मीठ चवीनुसार...

☘️कृती
प्रथम बाजरीच्या पीठात कांदा मिरची कोथिंबीर हळद घालून ताकात भिजवा
ताक जास्त नको असेल तर पाणी वापरा व सरसरीत भिजवा.
अर्धा तास भिजवून
चवीनुसार मीठ घाला
पीठ एकसारखे करून गरम तव्यावर धिरडी घाला
पीठ फार जाडसर नसावे
धिरडे घातल्यावर झाकण ठेवू नका
कडेने तेल सोडून कुरकुरीत करून घ्या
परत उलटून दुसरी बाजू भाजायची गरज नाही
तव्यावरून थेट डिश मधे घ्या 😊

☘️मस्त कुरकुरीत होतें
सोबत आवडीची चटणी घ्या.
मी ईथे ओले खोबरे भरपूर कोथींबीर घालून चटणी केली व वरून फोडणी घातली आहे.

Read More

🥕लाल गाजराचा हलवा🥕

हा हलवा एकदम सोप्या पद्धतीने आणि चटकन होणारा आहे
यात गजरे खिसून घ्यायचा व्याप नाही

🥕साहित्य
एक किलो लाल गाजरे
पाव किलो खवा
अर्धी वाटी साखर
वेलदोडे पुड
काजु बदाम काळे मनुके
पाऊण वाटी साजुक तूप

🥕कृती
गाजरे सोलून त्याचे एक एक बोटभर लांबीचे तुकडे करुन घ्यावे
हे तुकडे कुकर मध्ये वाफवून घ्यावे
थोडे कोमट असतानाच हे तुकडे मॅशर ने बारीक करावे

🥕हे बारीक केलेले मिश्रण एका पॅन मध्ये घालून एक चमचाभर तुपात चांगले पाच दहा मिनिटे परतून घ्यावे
यानंतर यात खवा व साखर घालुन एकत्र करावे
मिश्रण एकजीव झाले की वेलदोडे पावडर घालावी

🥕एका छोट्या कढईत तूप घालून
तूप गरम झाले की बदाम काजु तुकडे व काळ्या मनुका हे सर्व तळून घ्यावे
व ही तुपाची फोडणी हलव्या वर ओतून पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करावे

🥕गाजरे शिजवून बारीक केल्यामुळे व खवा वापरल्याने दुधाची गरज लागत नाही

🥕सजावट बदामाचे पातळ काप..

Read More

🌽बेबी कॉर्न भजी 🌽

🌽साहित्य
बेबी कॉर्न एक पाकीट
हळद ,तिखट ,मीठ , गरम मसाला
डाळीचे पीठ , ओवा
तांदुळ पिठी एक मोठा चमचा

🌽कृती
डाळीच्या पिठात एक चमचा तांदुळ पिठी घालावी
तिखट मीठ हळद, थोडा ओवा घालून गरम तेलाचे मोहन घालावे व पीठ भिजवून ठेवावे

🌽 सुरीने प्रत्येक बेबी कॉर्नला
आतुन कट उभे कट मारून घेणे
तिखट मीठ गरम मसाला याचे मिश्रण करून
चिरामध्ये पुर्ण भरुन घेणे
हे सर्व एक तासभर झाकुन ठेवणे
एक तासाने
याचे निम्मे निम्मे तुकडे करून घेणे

🌽तेल कडकडीत तापवून घेणे
व मध्यम आचेवर हे तुकडे डाळीच्या पीठाच्या मिश्रणात बुडवून तळून घ्यावे.
🌽छान कुरकुरीत टेस्टी भाजी तयार होतात😋

Read More

♦️शेंगदाणा चिक्की

♦️साहित्य

दोन वाटी शेंगदाणे

दिड वाटी गुळ

एक छोटी वाटी साजूक तूप

♦️कृती

प्रथम शेंगदाणे भाजून घ्यावे. भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्यांची सालं काढून घ्यावी.

♦️कढईत छोटी वाटी साजूक तूप टाकावे.
तूप गरम झाल्यानंतर त्यात बारीक केलेला गूळ घालून त्याचा घट्ट पाक होईपर्यंत पाच सात मिनिटे चमच्याने ढवळत राहावे

♦️नंतर मग गूळ वितळून घट्ट झाल्यानंतर एका छोट्या वाटीत पाणी घ्यावे व चमच्याने गुळाच्या घट्ट पाकाचे दोन थेंब पाण्यात सोडून गूळ कडक झाला का पहावे.

♦️पाण्यातील कडक गूळ हातात घेऊन तोडल्यास
गुळाच्या घट्ट मिश्रणाचा तुकडा पडत असेल तर चिक्कीसाठीचा पाक तयार झाला आहे असे समजावे

♦️नंतर गुळाच्या घट्ट पाकात भाजलेले शेंगदाणे, टाकून झाऱ्याने व्यवस्थित एकजीव करुन घ्या
दोन ते तीन मिनिटानंतर गॅस बंद करा.

♦️ एका ताटाला साजूक तूप लावुन घ्या
आता कढईतील चिक्कीचे मिश्रण ताटावर ओतून व्यवस्थित एकसमान पसरवून घ्या.

♦️ताटावरील मिश्रण पाच मिनिटं पंख्याखाली थंड होऊ द्या.
पाच मिनिटांनी आपल्या आवडीच्या आकाराच्या वड्या पाडून घ्या.

♦️नंतर पुन्हा मिश्रण पाचसात मिनिटे सुकवा.
वड्या व्यवस्थित कडक झाल्यानंतरच त्याचे तुकडे वेगळे करा.

♦️स्वादिष्ट चिक्की तयार आहे😋

Read More

गाजर 🥕मटार 🫛करंजी ..

सध्या ताज्या मटारचा सिझन आहे 😊
आणि गाजरे पण गोड चांगली मिळतात

या करंजी साठी

🫛साहित्य सारणा साठी
मटार, गाजर ,मिरची कोथिंबीर मीठ साखर लिंबू गरम मसाला
करंजी साठी
दोन भाग कणिक असेल तर अर्धा भाग डाळीचे पीठ

🥕कृती ..
प्रथम करंजीसाठी कणिक व डाळीचे पीठ एकत्र करून त्यात थोडे तेलाचे मोहन घालणे व तिखट मीठ हळद घालून घट्ट मळून घेणे

🫛 सारणासाठी फोडणी करून नेहेमी प्रमाणे त्यात हिंग व मोहरी घालून
नंतर मटार व गाजर कीस घालून पाच दहा मिनिटे वाफवून घेणे
त्यानंतर त्यात बारीक ठेचलेली मिरची साखर लिंबू मीठ गरम मसाला
कोथिंबीर घालून सारण तयार करून घेणे

🥕आता हे सारण करंजी मध्ये भरून करंज्या तयार कराव्या

करंज्या मध्यम आचेवर तळून घ्याव्या
खुप खुसखुशीत व चविष्ट होतात आवडी नुसार चटणी सोबत द्याव्या
(नुसत्या पण छान लागतात )

Read More