होते अजब नाते
वाटे स्नेहबंध
पण आता कळले
होते आभासी बंध
...
नियतीचे गणित
होते काहीसे वेगळे
काय करावे कळेना
कुठे जावे हे वळेना
...
कितीतरी मनात आले
काहीतरी राहून गेले
गंधीत वारे आलेले
ते ही होरपळले गेले
....
नाते ते ताऱ्याशी
पण होते दवांचे भास
वाटे फुलांची रास
जग जिवंत ते खास
....
अपेक्षांचे ओझे ते
गर्द गर्द होत गेले ते
जिव्हाळा कोरडा झाला
सप्तरंग ही पांढरा झाला
.
.©️✍️D.Vaishali