ई साहित्यवर आज बॅड कमांड हा प्रा. श्रीराम काळे लिखित कथासंग्रह प्रकाशित होत आहे. देवगड येथील काळेंच्या कथांना बहुतांशी कोकणची ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेली असते. त्या पार्श्वभूमीमधे कोकणचे निसर्ग सौंदर्य तर असतेच पण तिथल्या लोकांचा निर्भीड, स्पष्टवक्ता स्वभाव आणि त्याला  हापूसचा गोडवा याचीही साथ असते.
बॅड कमांड हा काहीशा बोल्ड कथांचा संग्रह आहे. माणसांच्या परस्परसंबंधांतील न बोलल्या जाणार्या पण कायम तरळत असणार्या वासनांचा या कथांवर प्रभाव आहे. समाजातील व्यंग अचूक पकडून त्यावर प्रकाश टाकणाऱ्या चटकदार  कथा या संग्रहात आहेत. 
- सुनीळ सामंत, ई साहित्य प्रतिष्ठान 
www. e sahitya .com  वरून मोफत डाऊन लोड करा.