“बालदिन”
बालदिन साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांच्या मृत्यू नंतर आदरांजली देण्याच्या हेतूने, भारत सरकारने पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म दिवस 14 नोव्हेबंर 1889 ला बालदिन म्हणून घोषित केला. कारण त्यांचे लहान मुलांच्या प्रति असणारे जीवापाड प्रेम आणि त्यांच्यावर ते भरपूर माया करत होते. त्याचसोबत मुले सुद्धा त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत. अशाप्रकारे चाचा नेहरू चा वाढदिवस आणि भारतातील मुलांसाठी त्यांच्या स्वप्नांचे आठवण करण्याच्या हेतूने बालदिन मोठया उत्साहाने साजरा करतात.
मुलं हि आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. लहान वयातच मुलांना योग्य तो मार्गदर्शन मिळालं तर ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील या विचाराने पंडित जवाहलाल नेहरूंनी मुलासाठी अनेक योजना आखल्या आहेत. लहान मुलं म्हणजे नेहरूंचा जीव कि प्राण होता. मुले म्हणजे देवाघरची फुले असं ते कायम म्हणायचे. मुलावर योग्य ते संस्कार व्हावेत, त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी भरपूर प्रयत्न करायला हवेत. मुलांचे पहिले गुरु आई - वडील तर दुसरे शिक्षक असतात त्यामुळे त्यांचा मनावर उत्तम संस्कार करणं ही त्यांची जबाबदारी असते. असं त्याच म्हणणं होत. मुलांचे अधिकार, शिक्षण आणि मुलांच्या जडणघडणीबाबत पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात नेहरूंचा मोलाचा वाटा आहे.
हा दिवस साजरा करण्यासाठी मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जावं असं ठरविण्यात आलं. आजही आपल्या देशभरातील अनेक शाळा, कार्यालय, सरकारी संस्था अशा बऱ्याच ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे, स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. सगळ्याचं जीवन प्रकाशमान करणाऱ्या सूर्याला तसेच आमच्या आयुष्यातला अज्ञानाचा आणि गरीबाचा अंधार दूर करणाऱ्या सूर्यनारायणाला म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूंना कोटी कोटी दंडवत प्रणाम ....
प्रत्येक गोष्टी आपल्याला विकत घेता येते पण बालपण नाही. बालदिवस आनंदाने व मोट्या उत्साहाने साजरा करा आणि मुलांना भरपूर म्हणजे भरपूर प्रेम घ्या. हॅपी चिल्ड्रन्स डे.
Article By - Anjali Patil
Brainsmedia Solution