लेकच असते जवळची
कितीही केले सुनेने तरी
चार घटका म्हणायला फक्त जवळ असते
पण मनात तर तिचं बसते
सून मरेपर्यंत लागते
कारण तिची गरज असते
सासरी चालली जाईल म्हणून मोठ्या चुका मुलीच्या माफ होतात
सुनेला छोट्या छोट्या चुकांवर मात्र टोमणे मिळतात.
लेकीच बाळंतपण करून लगेच जरी मोकळी होते.
पण क्षणा क्षणाला काळजी त्यांचीच असते.
सुनेच्या मुलाला नक्कीच दुधा वरच्या साय प्रमाणे जपते
कारण ते मुल फक्त सुनेचे नाही तर तिच्या लाडक्या मुलाचे असते .
माहेरवाशीण लेकीला चार दिवस प्रेमाने पोळी खाऊ घालते
सूने साठी ठेवताना मात्र चार शब्द ऐकवते.
घरातील प्रत्येक गोष्ट बाई सूनेवर लादते
आणि लेकीला आराम कर म्हणते
म्हणत नाही की सासू सुनेवर अत्याचार करते
पण स्वतःची जागा देताना मधून तीळ तीळ तुटते
कर्तव्य देताना सगळे भर भरून देते
हक्क द्यायची वेळ आली की मात्र जीवाने कासावीस होते