" A Thursday" च्या निमित्ताने!! (महिला दिन विशेष)
अलीकडेच एक सुंदर सिनेमा बघण्यात आला त्याच नाव "A Thursday"! आपली समाज व्यवस्था आणि शासन यांच मार्मिक चित्रण या सिनेमात आहे. शाळेत जाणारी 15 /16 वर्षाची मुलगी नैना तिच्या वर स्कुल बस मध्ये बस चा वाहक आणि चालक दोघे मिळून बलात्कार करतात. पोलीस कम्प्लेन्ट केली जाते पण नेहमी सारखेच त्या मुलीच्या पदरात निराशाच पडते. तिची आई आणि ती न्याय मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात पण रिझल्ट शून्य! पुढे जाऊन ती मुलगी आपल्या वर झालेल्या अन्याया विरुद्ध आवाज उठवते . सोशल मीडिया च्या आधारे पोलीस यंत्रणा आणि सरकारला ही वेठीस धरते. अक्षरशः देशाच्या पंतप्रधाना ना भेटण्याची ती मागणी करते आणि लहान वयात तिच्या वर झालेल्या त्या अत्याचारा साठी न्याय मागते. ही झाली सिनेमाची कथा तिथे काय अशक्य गोष्टी सुद्धा शक्य झाल्या अस दाखवले जाते पण स्त्री अत्याचाराच्या घटना आज ही आपल्याकडे त्याच आहेत त्यात बदल झाला आहे का?
सिनेमा बघून असा प्रश्न पडतो की मुलीला कस आणि किती सुरक्षित ठेवायचे? तिला शाळेत कॉलेज ला तर जावे लागते , तिला सेक्युरीटी म्हणून मग आपण तिच्या मागे जायचे का ? स्कुल बस,शाळा,कॉलेज ऑफिस अशी बरीच ठिकाण आहेत जिथे स्त्री आज ही सुरक्षित नाही आहे. इतकेच काय भर सार्वजनिक ठिकाणी ही तिला मारहाण,शिवीगाळ किंवा विनयभंग केला जातो. मग काय मुलीला जन्माला येऊ द्यायचे नाही का? समाज किती ही शिकला सुशिक्षित झाला तरी 10/ 20 टक्के विकृत पुरुष आज ही समाजात आहेत. त्यांना लहान मुलगी ज्येष्ठ महिला हा फरक दिसत नाही ,दिसते ती फक्त "मादी" ! किती दिवस हे आणि असच चित्र आपल्या समाजात असणार आहे? मुलींना मोकळे पणाने मोकळ्या आभाळात श्वास घ्यायला कधी मिळणार आहे? का आपली शासन यंत्रणा इतकी कमकुवत आहे ?का नाही जबर आणि कडक कायदा अंमलात येत? निदान मुली ला स्व रक्षणासाठी काही तरी अधिकार द्यायला हवा की नको? समाजात वावरताना तिला आपण सुरक्षित आहोत असे वातावरण द्यायला हवे. बलात्कारा सारख्या गुन्ह्याला तितकेच भयानक शासन हवे की नको? आपल्या कडे लोक शाही आहे म्हणून वाटेल तसे वागायचे आणि स्त्री वर अत्याचार करायचे याला पायबंद कधी घालणार ? घरात आणि बाहेर दोन्ही कडे ती सेफ नाही. फक्त "8 मार्च " ला तिचा मान सन्मान करायचा,तिच्या कर्तबगारीचे गोडवे गायचे आणि उरलेले 364 दिवस तिच्या वर बलात्कार करायचा? आता ही हा लेख लिहीत असताना देशात दोन चार बलात्कार सहज झालेले असतील. तिच्या वर होणाऱ्या अन्याया विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी तिला अजून किती वर्षे संघर्ष करावा लागणार आहे? गुन्हेगाराला असे कठोर शासन हवे की पुन्हा त्याने नजर वर करून एखाद्या स्त्री कडे पाहिले नाही पाहिजे. कधी तशी यंत्रणा आपल्या देशात येणार?
केवळ मूठभर वासनांध पुरुषांमूळे समस्त पुरुष वर्गाला बदनाम केले जाते मग ही घाणेरडी वृत्ती वेळीच ठेचायला आपला समाज कधी पूढे येणार? का तिला तिच्या न्याया साठी "A Thursday" मधील नायिका "नैना" बनावे लागणार??
समाप्त