देवाक काळजी
जुने वर्ष संपले दोन हजार एकवीस,
आता येईल नवीन वर्ष दोन हजार बावीस,
सगळंच चांगलं घडू दे अशी आहे आमची इच्छा,
ती पूर्ण होण्यासाठी तू दे आम्हाला तुझ्या आशीर्वादाची शुभेच्छा,
सर्वांना निरोगी आनंदी उत्साही व आशादायी ठेव हीच आहे सदिच्छा,
पुन्हा सर्व पहिल्या सारखं व तेजीत होऊ दे असा राहू दे सुर,
सर्वांच्या मनात आशेची चैतन्याची कारंजी फुलू दे असा असू दे नुर,
देवा तूच आता शक्ती दे या अशा भीतीदायक व अकस्मात आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ दे,
अशा कठीण प्रसंगातून पुन्हा एकदा भरारी मारण्याची कळ दे,
हे परमेश्वरा आता तुलाच आहे आम्हा गरीब सामान्य माणसांची काळजी,
हे विधात्या आमचं व या देशाचं संरक्षण करण्यासाठी आता तूच पाठव पुन्हा एकदा तडफदार हुशार व शूरवीर राजा शिवाजी, राजा शिवाजी!