स्वतःचा विचार करणं, जमत नाही मला..
तोंडापूरत चांगलं म्हणणं, जमत नाही मला..
कुणी चांगलं म्हणावं, म्हणून खोटं खोटं
चांगलं वागणं ,बोलणं, जमत नाही मला..
कोणाला फसवून आपला फायदा करन,
जमत नाही मला.. न भविष्यातही कधी जमणार नाही..
पण हे सगळं मला जमत नाही ,म्हणून
जर कोणी म्हणत असेल की
" काहीच जमत नाही तुला"
तर काहीही न जमण्याचा
अभिमान आहे मला...
✍️✍️💞Archu💞
-Archana Rahul Mate Patil