उल्हासनगर मध्ये अंध हितकारी संस्थेच्या माध्यमातून अंध लोकांना जेवण व राशन वाटप
उल्हासनगर ;. अंध हितकारी संस्थे चे संस्थापक जगदीश पटेल हे गेली ४० वर्षा पासून हि संस्था चालवीत आहेत. त्यांच्या माध्यमातून दिवा पासून वांगणी. पर्यंत तसेच अनेक ठिकाणी अंध व्यक्ती राहतात त्या अंध व्यक्ती ला भिक मागण्या साठी रेल्वे किंवा दुकाने या ठिकाणी जावून भीक मागून आपला उदरनिर्वाह करावा लागतो. सध्या राज्यात कोरोना मुळे लॉक डाऊन नियम लागू करण्यात आला आहे ह्या लॉक डाऊन मुळे सामान्य माणूसच नाही तर व्यापारी व उद्योगपती सुद्धा त्राही त्राही झाला आहे. अश्या परिस्थतीत ह्या अंध अपंग व्यक्तींचे काय ? यांना तर भिक्षा मागून आपले जीवन जगावे लागते. ही जाणीव ठेवून उल्हासनगर मधील अंध हितकारी संस्थे चे संस्थापक जगदीश पटेल यांनी दानशूर व्यक्ती यांना विनंती केली आहे की सध्या च्या परिस्थीत अंध अपंग व्यक्ती यांना मदती साठी पुढे यावे.