तुझ्याशिवाय....
जीवन तुला काय कळाले,
कठीण प्रसंगी सगळे पळाले.
सगळे मनासारखे घडले पाहिजे,
असे कुठे असते का?
मखमली जीवनात सुख-दुःखाचा,
पाठशिवणीचा खेळ चालनारच.
दुःखाचा डोंगर सरत नाही,
म्हणून कोणी मरतं का?
आपण मेलं की काही नाही उरत,
थोड्या दिवस उरतात त्या फक्त आठवणी
तुझ्यासोबत खूप शिव्या दिल्या सरणाला,
आता मात्र कवटाळून बसावसं वाटतंय मरणाला.
तु माझ्यासाठी रोज नटत होतीस,
प्रसन्न जीवन जगण्यासाठी रोज भेटत होतीस.
माझं गुलाबी मन उन्हाने होरपळून निघतंय,
तुझ्या आठवणीत माझं मन रोज मरतंय.
उजेड संपला, अंधार दाटला,
सारा मायेचा पाझर आटला.
काय करु? कुणाला सांगू?,
माझं हृदय लागलंय फाटू.
तू मला सोडलं असतं, वाईट वाटलं नसतं,
वाईट वाटतंय, जीवन जगणं सोडलंस.
तू गेलीस,पण मी नाही जाणार,कारण
देवाला,तू जाण्याचा जाब कोण विचारणार.........
(आपल्या आयुष्यातून माणूस निघून गेला,की मग त्याच्या विषयीचं सगळं निट लिहून काढलं की त्याच्या जाण्याचा खरा अर्थ आपल्याला समजतो)
_"दि सुभाष"