मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते!!१!!
नको कुणाचा दुरावा
मनात जिव्हाळा असावा
जीवनात आनंद मिळावा
भाग्य लागतं चांगला मित्र
आपल्या सोबत भेटावा...
मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते!!२!!
करार नाहीं कधी झाला
थरार नाहीं कधी आला
तुज्या विषयी मनांत आधार
हा जिवलगा सारखा संचार
करु लागला मित्रत्व नात
निभावून लाभला.
मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते.!!३!!
नाहीं कुणा विषयी संकोच
नाहीं कुणा वाचून अडत
मित्रा शिवाय कुठल्याही
नाही कोणता जातीभेद
नाही चालत नातं रक्ताच
परके पण आपलेच
आठवण काढणारे आपलेच
रस्ता दाखवून मार्ग सांगणारे
आपलेच
मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते!!४!!
मित्रा शिवाय दुनिया नाही
मित्रा शिवाय जीवनात अर्थ नाही
मित्रा शिवाय मौजमजा नाही
मित्रा शिवाय आयुष्यात आनंद नाहीं
खऱ्या मित्राशिवाय जग काय आहे
समजत नाही मित्रा विषयी
मनांत असणाऱ्या दऱ्याला
खेचणारा कुणी नाही....
मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते!!५!!
आयुष्यात करावी मैत्री
विश्वासात असावी खात्री
कधी नसावी कुणासोबत
वैरी अशीच निभवावी
शेवटपर्यंत खरी मैत्री
मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते!!६!!
मैत्रीला कोणतीच नाहीं आकृती
भावनांना कोणतीच नाहीं प्राकुर्ती
मैत्रीला आठवण करून देणारी
असते कुठे सीमा आखून ठेवलेली
जीवनातल्या इतिहासात जमा
असावीत खरी खुरी जिवाच्या
पाड जपणारी अशीच असावी
आपल्या मनात संस्कृती
मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते!!७!!