Quotes by UMESH in Bitesapp read free

UMESH

UMESH

@umesh8783

इतक्या दिवस तुझा हात
माझ्या हातात होता
तुझा श्वास माझ्या श्वासात होता
माझा जीव तुझ्यात होता
तुझं मन माझ्या सोबत होत
तुझा जीव कुठं माझ्यात होता
शेवटी तु मला एकटा जीव
  सदाशिव केला होता..

पहिली भेट बस स्टाप वर झाली होती.
आपली ओळख हळूहळू झाली होती
  तुझी माझी मैत्री होत चालली होती
  अचानक झालेल्या मैत्रीची सुरुवात
  प्रेमाच्या रुपात झाली होती..

  तुझा जीव कुठं माझ्यात होता
शेवटी तु मला एकटा जीव
  सदाशिव केला होता....

तुझी हकीकत तू मला सारखं
  आठवण करून देत राहिली...
माझी खासियत तू एक बनवून
  तुझा हिस्सा हृदयात ठोके देऊ
  लागली...

  तुझा जीव कुठं माझ्यात होता
शेवटी तु मला एकटा जीव
  सदाशिव केला होता....
 
  तुझी नजर माझ्यावर खिळली होती..
   माझी काया कुडी माया मोह आवरता
   घेत होती...
    तुझा स्पर्श मिलनात भरभरून साथ
     देत होती..
     दुसऱ्या मुलींमध्ये तु मला दिसतं होती

तुझा जीव कुठं माझ्यात होता
शेवटी तु मला एकटा जीव
  सदाशिव केला होता....

   तुझं ज्या दिवशी लग्न ठरलं
    मला आत्ता कळून चुकलं
    तुझं स्वप्न पाहणं सोडून दिलं
    तु तुझ्या संसारात सुखी राहा
    एवढचं माझं अश्रू सांगत राहिलं

तुझा जीव कुठं माझ्यात होता
शेवटी तु मला एकटा जीव
  सदाशिव केला होता....
   
   शेवटी तु माझी नाही
    मी शेवटी तुझा नाही
   आयुष्य कुणाचं खेळणं नाही
   जीवनात कुणाची भावना दुखावली नाहीं
   असंच आपलं आपल्या दोघांच्यात
    उरल्या फक्त आठवणी त्या कधी
    शब्दांत मांडु शकतं नाहीं माझं
    दुःख कुणाला सांगून उपयोग नाहीं
        तुझा जानू
        तूं माझी पिलू....


 
 

Read More

कुठे जायचं म्हटले तरी जाऊ वाटत नव्हतं
कुणाशी कांही बोलू का नको की बोलले की
वाटायचं कुणी कांही माझ्या घरीं सांगतील
का असं मनांत वादळं सशयाचं होतं

कित्तीही मनापासून प्रेम केले
कितीही एकतर्फी प्रेम नाहीं केले
करुनही नाहीं समजले
त्या प्रेम करण्याला काय अर्थाने
प्रियकाराने नातं जोडले

मनाची कितीही तू स्वच्छ प्रतिमा करते
मनाची कितीही तु काळजी करते
कितीही तु प्रेमाच्या आठवणी काढते
तु पुसण्याचा प्रयत्न करते
दुःख तुला विसरू वाटते
ते शेवटी ते मनाच्या मोहाच्या पलीकडे नेते

कांही केल्या ते इतके
प्रेम करून शेवटी
काळी छटा ऊभी करते
रक्ताचं नातं होण्यापासून
विभक्त होते.

Read More

मला नेहमी वाटत रस्त्याने
चालतं चालतं जावं
तुझ्या शी बोलत रहावं
तुझ्या मनातील भावना
माझ्या मनात घर बनवावं

आयुष्यात तू कांही मला
जगण्याची उमेद दिली
तुझ्या जिवनात तशीच
चित्रात रंग भरवत
तुला प्रत्येक क्षण
उणीव भासवत हृदयांत
जागृत स्थान देत

एकमेकांच्या डोळ्यात
पाहून विश्वास संपादन
सहवास मिळवून समजून
मिलनातं एकरूप होऊन
बिलगुन सोनेरी पांघरून
दिवसाची रात्र जागुन
सकाळ उजाडून
तुझी आठवण
सोबत घेऊन
उराशी बाळगून
नव्या कामांची
सुरुवात करून
तुला भेटायला
परतुन येतांना
कांही तरी तुझ्या साठी
घेऊन यावे ती
तुझ्या चेहऱ्यावर वरती
मला दिसावी ती
प्रसन्नता

माझ्या भेटण्याची
तुझ्या मनात
होती आत्मीयता
तुला सारख
सांगत होती
तुला खुनवत होती
तुला हसवत होती
तुला वाट पाहायला
सांगत होती
दार उघडून स्वागत
करायला डोळे मिटून
उघडे करून तरसत
होती तुझ्या मिठीत
पडून प्रेमाची परीक्षा
घेत होती.

तुझ्या आठवणी ऊन
सावली सोबत घेत
तुझ्या स्पर्शाने मन
मोकळे होऊन
फुलतं होतं रानं
तूंच आहे माझ्या
जीवनाचं गाणं
संपत आला रस्ता
तूझ आयुष्य जगत
माझं आकर्षण
तू घेतलं वेधुन
तू साचवल वेचून

तु माझं जगणं केलं हराम
माझं हृदय तुला करत
रोज रोज आलम
तु रागात करते कलम
मी न चुकता न राहता
तुझी वाट पाहता
माझं रक्ताचं नातं
करत तुला सलाम

Read More

नकळत मैत्री झाली सांगु कुणाला
रोज रोज मन लागलं गुतायला
तू माझ्यासाठी इतके केले
की सांगू नाही शकणार मनाला
तुला बोललो होतो उद्या त्रास होईल
माझ्या भावना छळतील तुला
एकटा पडल्यावर स्वतःला सावरशील कसा
जीव लावू नकोस मला...!!१!!

तु माझ्या इतक्या जवळ राहून
माझ्या आयुष्यात तु खूप काही
शिकून साथ कधी न सोडून
कधी नाहीं दाखवलं बोलून
तुज कसं फेडू ऋण
माझ्या यातना तू सांगशील
ऐकून घेईल कोण
म्हणून सांगतो श्वास आहे
तो पर्यंत तुझ्या साठी ठेवलं रोखून...


नकळत मैत्री झाली सांगु कुणाला
रोज रोज मन लागलं गुतायला
तू माझ्यासाठी इतके केले
की सांगू नाही शकणार मनाला
तुला बोललो होतो उद्या त्रास होईल
माझ्या भावना छळतील तुला
एकटा पडल्यावर स्वतःला सावरशील कसा
जीव लावू नकोस मला...!!२!!

काही असुदे काही नसुदे
मी आहे तुझ्या सोबत अशी
आशा कायम जवळ राहू दे
माझी वचन लक्षात असु दे

नकळत मैत्री झाली सांगु कुणाला
रोज रोज मन लागलं गुतायला
तू माझ्यासाठी इतके केले
की सांगू नाही शकणार मनाला
तुला बोललो होतो उद्या त्रास होईल
माझ्या भावना छळतील तुला
एकटा पडल्यावर स्वतःला सावरशील कसा
जीव लावू नकोस मला...!!३!!


आज जाऊ किंवा उद्या जाऊ
प्रत्येक दिवस उजडतं नेवू
आपले किस्से इतरांना सांगत राहूं
तुझी माझी गट्टी मोठी जमवत ठेवू
जाता येता सर्वांना हसवत राहूं
इतरांच्या मनांत जागा बनवत
पान लिहीत पुढे जाऊ...


नकळत मैत्री झाली सांगु कुणाला
रोज रोज मन लागलं गुतायला
तू माझ्यासाठी इतके केले
की सांगू नाही शकणार मनाला
तुला बोललो होतो उद्या त्रास होईल
माझ्या भावना छळतील तुला
एकटा पडल्यावर स्वतःला सावरशील कसा
जीव लावू नकोस मला...!!४!!


आपली भूमिका सर्वांसोबत
कितीही चांगली असली
कितीही तु निभावली
कितीही तू सांगितली
कितीही तू मांडली
तूझी दया तुझ्या खऱ्या
मित्राला आली
तुझी कसर त्यालाच
तुझ्या दुःखात झाली

नकळत मैत्री झाली सांगु कुणाला
रोज रोज मन लागलं गुतायला
तू माझ्यासाठी इतके केले
की सांगू नाही शकणार मनाला
तुला बोललो होतो उद्या त्रास होईल
माझ्या भावना छळतील तुला
एकटा पडल्यावर स्वतःला सावरशील कसा
जीव लावू नकोस मला...!!५!!


कधी तुझा शब्द पडू नाहीं दिला
तुला कधीं बोलवायला न विसरला
कधी तुझ्या आठवणी
सांगायला धजला माझ्या पासून
दुर कधी गेला त्यांचा पत्ता नाहीं
सांगून गेला मी वाट पाहत
आहे कधी येईल भेटायला मला


नकळत मैत्री झाली सांगु कुणाला
रोज रोज मन लागलं गुतायला
तू माझ्यासाठी इतके केले
की सांगू नाही शकणार मनाला
तुला बोललो होतो उद्या त्रास होईल
माझ्या भावना छळतील तुला
एकटा पडल्यावर स्वतःला सावरशील कसा
जीव लावू नकोस मला...!!६!!

स्वतःच काम ठेवलं बाजूला
दुसऱ्याला आनंद जास्त
दुःख दाखवून देत नाही कुणाला
मन जिकतो सर्वांचं सांगत
नाही जगाला कारण
जीवाला जीव देणार
आहे संख्याला


नकळत मैत्री झाली सांगु कुणाला
रोज रोज मन लागलं गुतायला
तू माझ्यासाठी इतके केले
की सांगू नाही शकणार मनाला
तुला बोललो होतो उद्या त्रास होईल
माझ्या भावना छळतील तुला
एकटा पडल्यावर स्वतःला सावरशील कसा
जीव लावू नकोस मला.!!७!!

जिवनात रडू आलं नाहीं
कधी रडू दिलं नाहीं मला
कधी रागवल नाहीं तुला
आठवण येत माझ्या मनाला
सांग आत्ता तूंच मला
बोलू कुणीच माझं ऐकून
घ्यायला तूंच होता फक्त एकटा
माझं ऐकून समजून घ्यायला
माझ्याशी बोलायला

Read More

मित्र पाहून हसतो मला
माझ्या आठवणी सांगतो
दुसऱ्याला बोललं कधी
जाऊ एक दिवस त्यांच्या
घरी भेटायला...!!१!!

नवीन झाली ओळख
नव्हती माझी पाळख
आज होईल नव्या
चेहऱ्याची ओळख
तूच माझा खरा मित्र
वाटुन घेऊ सुख दुःख


मित्र पाहून हसतो मला
माझ्या आठवणी सांगतो
दुसऱ्याला बोललं कधी
जाऊ एक दिवस त्यांच्या
घरी भेटायला...!!२!!

मित्र आहे तर मजा
नाहीतर स्मशान सारखी
होईल सजा मैत्री हिच
खरी मौजमजा आनंदाची
भर आणून देईल रजा


मित्र पाहून हसतो मला
माझ्या आठवणी सांगतो
दुसऱ्याला बोललं कधी
जाऊ एक दिवस त्यांच्या
घरी भेटायला...!!३!!

करावी मैत्री दोस्तीत
पकडू नको चुक कात्रीत
विश्वास ठेव मनात
आठवण ठेवून जाईल
दाराच्या अंगणात
खेळ खेळत होता
माझ्या सोबत

मित्र पाहून हसतो मला
माझ्या आठवणी सांगतो
दुसऱ्याला बोललं कधी
जाऊ एक दिवस त्यांच्या
घरी भेटायला...!!४!!

तुझाच मित्र त्याला नको
दुसऱ्याचा हेवा.सतत
सोबत फक्त मी हवा
मित्राचा नाहीं फक्त
एका जुना मित्र
तोच मला हवा

मित्र पाहून हसतो मला
माझ्या आठवणी सांगतो
दुसऱ्याला बोललं कधी
जाऊ एक दिवस त्यांच्या
घरी भेटायला...!!५!!

Read More

माझे मित्र आहे खूप म्हणायला
जीवाला जीव दयाला दहा नाही
लाखात आहे माझ्या सोबतीला
दुःख होत नाही माझ्या मनाला !!१!!

मनाचा कोपरा असतो भरलेला
कधी सांगू असं होतं मनाला
कधी हसवतो साऱ्या जगाला
नाही बोलला दुःख होतं
माझ्या डोळ्यातल्या अश्रुला

माझे मित्र आहे खूप म्हणायला
जीवाला जीव दयाला दहा नाही
लाखात आहे माझ्या सोबतीला
दुःख होत नाही माझ्या मनाला !!२!!

तुजीच सोबत घेऊन जाईल शिदोरीला
आठवणींत असणाऱ्या मैत्रीला
अशीच कायम लक्षात आपल्या दोस्तीला
तशीच राहिल असं वाटतं नाही मस्तीला


माझे मित्र आहे खूप म्हणायला
जीवाला जीव दयाला दहा नाही
लाखात आहे माझ्या सोबतीला
दुःख होत नाही माझ्या मनाला !!३!!

मैत्री असते खटा मिट्टहा
जीवाचा होतो अठ्ठा पिठा
वाढदिवस साजरा होतो मोठा
यारीचा दरारा आहे मोठा

माझे मित्र आहे खूप म्हणायला
जीवाला जीव दयाला दहा नाही
लाखात आहे माझ्या सोबतीला
दुःख होत नाही माझ्या मनाला !!४!!


खूप होते दुनिया दारी
मैत्री ही विश्वास करी
मैत्री झाली आयुष्य भर
सोबत असावी फक्त न्यारी
सतत राहावी रंगत भारी

माझे मित्र आहे खूप म्हणायला
जीवाला जीव दयाला दहा नाही
लाखात आहे माझ्या सोबतीला
दुःख होत नाही माझ्या मनाला !!५!!

Read More

मैत्री ही असावी जिवाभावाची.
मैत्री ही घट नातं विनण्याची.
मैत्री हीं असावी निखळ प्रेमाची.
मैत्री नसावी वेगळी करण्याची.!!१!!

हृदयाच्या कोपऱ्यात असतो कोपरा
मनाच्या आठवणीत हसरा चेहरा
डोळ्याच्या अश्रूंत असतो आनंदाचा झरा
रोजच्या आयुष्यात तूंच मित्र खरा

मैत्री ही असावी जिवाभावाची.
मैत्री ही घट नातं विनण्याची.
मैत्री हीं असावी निखळ प्रेमाची.
मैत्री नसावी वेगळी करण्याची.!!२!!

सुख दुःखात वेळेला येतो मदतीला
तुज्या सोबत राहुन स्वभाव बदलला
माझ्या भावना तुला सांगायला
तुजा आधार आहे माझ्या जीवाला
एकमेकांना समजून घ्यायला

मैत्री ही असावी जिवाभावाची.
मैत्री ही घट नातं विनण्याची.
मैत्री हीं असावी निखळ प्रेमाची.
मैत्री नसावी वेगळी करण्याची.!!३!!

कधी चुकले माप केले मित्राला
कधी नजरेसमोर नाही दिसला
असं वाटतं गेला कुठे फिरायला
तू असावा असं वाटतं मनाला
एकटा नसावा आसरा कुणाला

मैत्री ही असावी जिवाभावाची.
मैत्री ही घट नातं विनण्याची.
मैत्री हीं असावी निखळ प्रेमाची.
मैत्री नसावी वेगळी करण्याची.!!४!!

तू कधी सांगशील जाऊ फिरायला
मित्राशिवाय अर्थ नाहीं जगण्याला
भेटल्यावर आठवण येईल प्रत्येक क्षणाला
हसतमुख राहूं प्रत्येक दिवसाला
खरा आनंद मिळवून देईल माझ्या
सोबत असणाऱ्या मित्राला

मैत्री ही असावी जिवाभावाची.
मैत्री ही घट नातं विनण्याची.
मैत्री हीं असावी निखळ प्रेमाची.
मैत्री नसावी वेगळी करण्याची.!!५!!

Read More

मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते!!१!!

नको कुणाचा दुरावा
मनात जिव्हाळा असावा
जीवनात आनंद मिळावा
भाग्य लागतं चांगला मित्र
आपल्या सोबत भेटावा...

मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते!!२!!

करार नाहीं कधी झाला
थरार नाहीं कधी आला
तुज्या विषयी मनांत आधार
हा जिवलगा सारखा संचार
करु लागला मित्रत्व नात
निभावून लाभला.

मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते.!!३!!

नाहीं कुणा विषयी संकोच
नाहीं कुणा वाचून अडत
मित्रा शिवाय कुठल्याही
नाही कोणता जातीभेद
नाही चालत नातं रक्ताच
परके पण आपलेच
आठवण काढणारे आपलेच
रस्ता दाखवून मार्ग सांगणारे
आपलेच

मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते!!४!!

मित्रा शिवाय दुनिया नाही
मित्रा शिवाय जीवनात अर्थ नाही
मित्रा शिवाय मौजमजा नाही
मित्रा शिवाय आयुष्यात आनंद नाहीं
खऱ्या मित्राशिवाय जग काय आहे
समजत नाही मित्रा विषयी
मनांत असणाऱ्या दऱ्याला
खेचणारा कुणी नाही....

मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते!!५!!

आयुष्यात करावी मैत्री
विश्वासात असावी खात्री
कधी नसावी कुणासोबत
वैरी अशीच निभवावी
शेवटपर्यंत खरी मैत्री

मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते!!६!!

मैत्रीला कोणतीच नाहीं आकृती
भावनांना कोणतीच नाहीं प्राकुर्ती
मैत्रीला आठवण करून देणारी
असते कुठे सीमा आखून ठेवलेली
जीवनातल्या इतिहासात जमा
असावीत खरी खुरी जिवाच्या
पाड जपणारी अशीच असावी
आपल्या मनात संस्कृती

मैत्रीला नसते बंधन
मैत्रीला असते एक वळण
मैत्रीला नसते अनेक वचन
निभवायची नाही
टिकवायची असते!!७!!

Read More

पावसाच्या सरी येतील
पावसाच्या सरी भरुन देतील....
रुद्र अवतार घेईल!!१!!

निसर्ग सौंदर्य हरवुन जाईल
डोंगराच्या सानिध्यात वारा वाहिल....
पाने फुले माती भिजवून
नदी भरून ओसंडून येईल.….

पावसाच्या सरी येतील
पावसाच्या सरी भरुन देतील....
रुद्र अवतार घेईल!!२!!

पावसाचा आनंद हा नव्याने अजमावून या
पावसाच्या पाण्यात भिजवून
स्वताला हरकून घेऊ या ....

पावसाच्या सरी येतील
पावसाच्या सरी भरुन देतील....
रुद्र अवतार घेईल!!३!!

धुक्यातून चालणे अवघड जाते
पावसाच्या पाण्याने ओढून घेते
जिवाच्या आकांताने स्वतःचे
भान निसर्गात विसरून जाते

पावसाच्या सरी येतील
पावसाच्या सरी भरुन देतील....
रुद्र अवतार घेईल!!४!!

Read More

रिमझिम पावसात तुला पाहण्यासाठी
कॉलेज च्या पोरांना भिजवून टाकतेस
तू किती दिवस नाय म्हणतेस..!!१!!

केसांत कंगवा भिरुवून.
तोंडाला पावडर लावून.
डोळ्यावर गॉगल ठेवुन
तुज्यासाठी नवा शर्ट घालून.

रिमझिम पावसात तुला पाहण्यासाठी
कॉलेज च्या पोरांना भिजवून टाकतेस
तू किती दिवस नाय म्हणतेस...!!२!!

गाडी घेऊन यतोय
रोज येऊन बसतोय
तुज लेक्चर कधी
संपतय याची वाट पाहतोय


रिमझिम पावसात तुला पाहण्यासाठी
कॉलेज च्या पोरांना भिजवून टाकतेस
तू किती दिवस नाय म्हणतेस...!!३!!

सगळ्यांना हा म्हणतेस
मला एकट्याला नाहीं बोलतेस.
तु छान मेकअप करतेस माझ्या
मनाला चिखल उडवतेस.


रिमझिम पावसात तुला पाहण्यासाठी
कॉलेज च्या पोरांना भिजवून टाकतेस
तू किती दिवस नाय म्हणतेस...!!४!!

Read More