*नाटकी हस्य*
सकळी तो लवकर च उठला..
त्यांच् वय जेमतम १४-१५ वर्ष
आंघोळ करून आलेल्या ताटा समोर बसला,
आज भर भरून होत जेवायला..
जेवन करून तो स्वतःची कपडी धुवून समोर असणाऱ्या छोट्याशा बागेत बसला.त्याच्याच वयाची मूल खेळत होती..बाबाशी हट्ट धरत होती त्यांच्या मागे धावत होती त्यांच्या खांद्या वर बसून
खाऊ खात होती...
तो मात्र गप्प बसून सर्व पाहत होता..एका छोट्याशि गुलगुलित मुलगी त्याच्या समोर आली न सोबत खेळण्याचा हट्ट करू लागली.
हा तिच्या सोबत मनसोक्त खेळत होता,तो धावत होता आणि ति त्याच्या पठीमागे धावत असे.हा सर्व प्रकार तिथे बसलेले तिचे आई बाबा बघत होते आणि त्यांना फक्त कौतुक त्यांच्या मुलीच.काही क्षणा नंतर त्या मुलींच्या बाबानी त्या दोघाना खाऊ आणून दिला ति आणि तो खात असताना तिने त्याला विचारले
आज रविवार ना बाबा घरी म्हणून आम्ही बागेत आलो,आणि आज फादर्स डे..
ये तू केल का रे बाबा ना विश..?
तुझे बाबा कुठयत रे...?
हे शब्द एकताच डोळ्यातुन अश्रु आले,हातात ला खाऊ फेकून तो धूम पळत सुटला..
आश्रमात गेल्या वर तो गप्प एका जागे वर बसून होता आणि रडत होता,सगळे पाहतील आपली फजीती होइल, सगळे हासतिल या भीतिने तो बाथरूम मधे गेला न तास भर भरभरून रडला...
अश्रु पुसून तो बाहेर पडला आणि तोंडा वर पाण्याने हाथ फिरवून तो पुन्हा नाटकी हस्य करून मित्रात खेळायला लागला.
तो अनाथ होता आणि तो का रडला याला स्पष्टीकरणाची गरज नाही.
#म्हणून ते आहेत तो पर्यंत भर भर प्रेम करा..
#कारण आपल्या सारखे सगळे च नशीबवान नसतात
#वडील