Quotes by Dhanesh Khandare in Bitesapp read free

Dhanesh Khandare

Dhanesh Khandare

@dhaneshkhandare9gmail.com6547
(6)

*नाटकी हस्य*
सकळी तो लवकर च उठला..
त्यांच् वय जेमतम १४-१५ वर्ष
आंघोळ करून आलेल्या ताटा समोर बसला,
आज भर भरून होत जेवायला..
जेवन करून तो स्वतःची कपडी धुवून समोर असणाऱ्या छोट्याशा बागेत बसला.त्याच्याच वयाची मूल खेळत होती..बाबाशी हट्ट धरत होती त्यांच्या मागे धावत होती त्यांच्या खांद्या वर बसून
खाऊ खात होती...

तो मात्र गप्प बसून सर्व पाहत होता..एका छोट्याशि गुलगुलित मुलगी त्याच्या समोर आली न सोबत खेळण्याचा हट्ट करू लागली.
हा तिच्या सोबत मनसोक्त खेळत होता,तो धावत होता आणि ति त्याच्या पठीमागे धावत असे.हा सर्व प्रकार तिथे बसलेले तिचे आई बाबा बघत होते आणि त्यांना फक्त कौतुक त्यांच्या मुलीच.काही क्षणा नंतर त्या मुलींच्या बाबानी त्या दोघाना खाऊ आणून दिला ति आणि तो खात असताना तिने त्याला विचारले

आज रविवार ना बाबा घरी म्हणून आम्ही बागेत आलो,आणि आज फादर्स डे..
ये तू केल का रे बाबा ना विश..?
तुझे बाबा कुठयत रे...?

हे शब्द एकताच डोळ्यातुन अश्रु आले,हातात ला खाऊ फेकून तो धूम पळत सुटला..
आश्रमात गेल्या वर तो गप्प एका जागे वर बसून होता आणि रडत होता,सगळे पाहतील आपली फजीती होइल, सगळे हासतिल या भीतिने तो बाथरूम मधे गेला न तास भर भरभरून रडला...

अश्रु पुसून तो बाहेर पडला आणि तोंडा वर पाण्याने हाथ फिरवून तो पुन्हा नाटकी हस्य करून मित्रात खेळायला लागला.

तो अनाथ होता आणि तो का रडला याला स्पष्टीकरणाची गरज नाही.
#म्हणून ते आहेत तो पर्यंत भर भर प्रेम करा..
#कारण आपल्या सारखे सगळे च नशीबवान नसतात
#वडील

Read More

"तुझा सहवास"

हो त्या वेळी मि वाट पाहत होतो तुझी,
तुझ्या येण्याची,तू आल्या नंतर दरवळनाऱ्यां त्या सुगंधाची,
तुझ्या ओल्या सहवासाची..

महितीये प्रिये,तुझा स्पर्श तुझ्या येण्याचा आनंद,तुझा सहवास आणि त्या सहवासा मधे गुणतुन जाणारा माझ्यातला मि...हा सापडतो फक्त तू आल्या नंतर..
ग तुझ असन फक्त माझ्या करिता हे एक आधार च देत नाही तर भावनाना स्पर्श करणारा क्षण असतो..!

तू ना खुप हट्टी आहेस,रागिट आहेस तुझ येन हे कधी कधी त्रासदायक असते,परंतु तुझ्या येण्याची आतुरता आणि तू आल्या नंतर प्रत्येक वेळी नव्यानी जन्म घेणार ते माझ प्रेम...! ते अधिका अधिक वाढत जात.

तू येत जा त्रास देत जा,कारण तुझा फक्त सहवास च नको तर तुझी साथ हवी आहे.
तू आल्या नंतर बघ ना माझ्या बेरंग जीवनाला सुद्धा रंग लागतात,दरवळतो चोहि कड़े तो आनंद..!
तुझ्या विना मि अपूर्ण माझ्या विना तू अपूर्ण...!
आणि जे प्रेम अपूर्ण असते ते प्रेम नसते,
म्हणून तू येत जा कारण आपल प्रेम हे अपूर्ण नाही तर परिपूर्ण आहे...
ये पावसा फक्त तू येत जा..!

#पहिल्या_प्रेमाचा_पहिला_पाऊस

©धनेश खंडारे

Read More

संसार

कड़क उन्हाळा न भयान शांतता..!
आज ही विचारात आठवणीत एकांतात गावातील शाळेत जऊन बसलो..!

शाळा बंद त्या मुळे शांतता..
बसून वेगवेगळा विचार येत होता..

आजूबाजू ला कोणी च नव्हतं,कधी पापनी लागली न कधी झोपलो कल्पना च नाही..!
कुठला तरी आवाज काना वर पडला..
तोच झोप उडाली,थोड्या अंतरावर.. २-३ चिमुकले खेळत होती..त्यांचा धींगाना चालू होता..
परत झोपन्याचा प्रयत्न करतं होतो पण चिमुकल्यानचा आवाज झोप उडवत होता...

शेवटी बसलो त्यांचा कड़े बघत..
२ मुलि आणि १ एक मुलगा..
छोट्या छोट्या डब्या..खेळ भांडी त्यात झाडाची पान,छोटा गैस,त्या वर भांडी..
एक छोटस घर च आहे जणु आसा खेळ..

त्यांचा तला संवाद थोड़ा काना वर पडला..

"ये हा माझा नवरा..
न आम्ही शेतात जातो..
तू आमची मुलगी तू घरी च थांब.."

लगेच त्यातली दूसरी मुलगी

"ये हा माझा नवरा न तू आमची मुलगी..
न तू घरी थांब.. नाय तर मि नाय खेळत..."

त्यांचा सवांद सोडा..
त्यांच् बोलन सोडा..

किती साहजिक च घडत होत्या ना लाहनपनी त्या गोष्टी ...म्हणजे घर घर म्हणजे (संसार) एक खेळ च खेळायचो, पण किती निरागस तेने..
अर्थ माहित नसायचा..पण भाव होता...
तो खेळ होता न आज ति एक जबाबदारी आहे..
ति निरागसता, तो चांगूलपणा, ते प्रेम ,तो भाव, या सगळ्या गोष्टी जबाबदारी आणि शारीरिक आकर्षण..
या ओझया खाली दडून पडल्या..

करण हा खेळ आज विकत घ्यावा लागतो..
या देवानघेवान ला हुंडा ही म्हणू शकतोच.!

आज बघतो तर प्रत्येक संसारात तू तू- में में ..
मानसिक,शारीरिक त्रास,पुरुषात्मक विचार,चीड़ चीड़ ,संशय,दारू या सगळ्या गोष्टी आज घडत आहेत, कारण प्रत्येक गोष्टी बाबतीत आपण मनाने किंवा प्रेमाने नाही तर डोक्यानी विचार करतोय..!

वाढत्या वया नुसार विचारात बदल होतोय पण मन मात्र कमकुवत होत चाललय..

सोप्या भाषेत सांगायच झाल तर..एक दिवस संसार लाहानपनी च्या खेळा सारखा जगून बघा..!
कारण ज्या वयात काही च कळत नव्हतं माझ्या मते तरी तिथे च प्रेम होत..!

-धनेश खंडारे

Read More