संसार
कड़क उन्हाळा न भयान शांतता..!
आज ही विचारात आठवणीत एकांतात गावातील शाळेत जऊन बसलो..!
शाळा बंद त्या मुळे शांतता..
बसून वेगवेगळा विचार येत होता..
आजूबाजू ला कोणी च नव्हतं,कधी पापनी लागली न कधी झोपलो कल्पना च नाही..!
कुठला तरी आवाज काना वर पडला..
तोच झोप उडाली,थोड्या अंतरावर.. २-३ चिमुकले खेळत होती..त्यांचा धींगाना चालू होता..
परत झोपन्याचा प्रयत्न करतं होतो पण चिमुकल्यानचा आवाज झोप उडवत होता...
शेवटी बसलो त्यांचा कड़े बघत..
२ मुलि आणि १ एक मुलगा..
छोट्या छोट्या डब्या..खेळ भांडी त्यात झाडाची पान,छोटा गैस,त्या वर भांडी..
एक छोटस घर च आहे जणु आसा खेळ..
त्यांचा तला संवाद थोड़ा काना वर पडला..
"ये हा माझा नवरा..
न आम्ही शेतात जातो..
तू आमची मुलगी तू घरी च थांब.."
लगेच त्यातली दूसरी मुलगी
"ये हा माझा नवरा न तू आमची मुलगी..
न तू घरी थांब.. नाय तर मि नाय खेळत..."
त्यांचा सवांद सोडा..
त्यांच् बोलन सोडा..
किती साहजिक च घडत होत्या ना लाहनपनी त्या गोष्टी ...म्हणजे घर घर म्हणजे (संसार) एक खेळ च खेळायचो, पण किती निरागस तेने..
अर्थ माहित नसायचा..पण भाव होता...
तो खेळ होता न आज ति एक जबाबदारी आहे..
ति निरागसता, तो चांगूलपणा, ते प्रेम ,तो भाव, या सगळ्या गोष्टी जबाबदारी आणि शारीरिक आकर्षण..
या ओझया खाली दडून पडल्या..
करण हा खेळ आज विकत घ्यावा लागतो..
या देवानघेवान ला हुंडा ही म्हणू शकतोच.!
आज बघतो तर प्रत्येक संसारात तू तू- में में ..
मानसिक,शारीरिक त्रास,पुरुषात्मक विचार,चीड़ चीड़ ,संशय,दारू या सगळ्या गोष्टी आज घडत आहेत, कारण प्रत्येक गोष्टी बाबतीत आपण मनाने किंवा प्रेमाने नाही तर डोक्यानी विचार करतोय..!
वाढत्या वया नुसार विचारात बदल होतोय पण मन मात्र कमकुवत होत चाललय..
सोप्या भाषेत सांगायच झाल तर..एक दिवस संसार लाहानपनी च्या खेळा सारखा जगून बघा..!
कारण ज्या वयात काही च कळत नव्हतं माझ्या मते तरी तिथे च प्रेम होत..!
-धनेश खंडारे