Marathi Quote in Blog by Sadhana v. kaspate

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

क्रश

अचानक तिच्या Crush चा फोन आला .
" आज मी , तुमच्या भागात येणार आहे. तुला वेळ असेल तर भेटुया का ? ५- १० मिनीटांसाठी ? "
ती क्षणाचाही विलंब न करता ती ' हो' म्हणाली. किती खुश झाली ती. लगेच तिने स्वतः ला आरशात पाहीलं.. पण ; नेमके आजच गालावर उगवलेले पिंपल बघुन ती थोडी नाराज झाली. तिला त्याच्यासमोर सुंदर दिसावसं वाटत होतं... साहजीकच आहे.
ती एखाद्या बाळाप्रमाणे तोंड फुगवुन बसली. तेवढयात कोणाचा तरी मेसेज आला. तिने बळच तो उघडुन पाहिला. त्याचाच होता तो ...
" हे डिअर.. तुझा dp खुप cute आहे. तु कधीच मेकअप करत जावु नको कारण ; तुझी smile इतकी सुंदर आहे की त्यापुढे कुठलाही मेकअप फिका पडेल.

A beautiful soul always reflects a beautiful smile
try to have a beautify your soul than your face ! "

हे वाचुन इतकावेळ चेहऱ्यावर दाटलेल मळभ क्षणात मोकळ झालं . आणि ती पुन्हा एकदा आरशात पाहुन खुदकन हसली. आरशात दिसणाऱ्या पिंपल कडे पाहुन तिने तोंड वाकड केलं. जणुकाही तिला म्हणायच होतं, ' हुं....आता मला तुमचं काही वाटतं नाही.'
आणि आरशातील स्वतःच्या प्रतिमेला पाहुन तिने एक गोड फ्लाईंग किस दिले आणि निघुन गेली.
बिचारा आरसा माञ खुपवेळ लाजत राहीला..
- साधना वालचंद कस्पटे ©

Marathi Blog by Sadhana v. kaspate : 111054122
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now