###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
??? सद्गुरु चरण सेवा ???
*●| श्री गुरुदेव दत्त |●*
जेव्हा आपण गुरुचरणीं येतो, येतो म्हणजे आपण येत नाही! "तो" भगवंत आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे आपल्याला गुरुचरणीं "पाठवतो," तेव्हा अनन्य भावाने आपण तिथे स्थिर राहिले पाहिजे. एकदा स्थिर झालो की आपले कर्तव्य असते की आपण गुरुंनी सांगितल्याप्रमाणे आपले आचरण ठेवणे, गुरुंची सेवा करणे, गुरुंनी दिलेली साधना "नित्यनेमाने" करणे, त्यामधे खंड पडता कामा नये, तसेच शक्यतो वेळ चुकवू नये, कारण आपण जसजशी साधना नेमाने करू लागतो, "गुरुदेव त्यावेळेला आपली वाट पाहात असतात". ही भावना एकदा का मनामधे रुजली की साधनेमधे सातत्य आपोआप येऊ लागते. आज झोप झाली नाही, आज बरं वाटत नाही म्हणून साधनेची वेळ चुकवू नये. अत्यंत महत्वाचं म्हणजे श्रेष्ठ गुरुंचे चरण आपल्याला मिळाले ही त्यांची आपल्याप्रती दयाभावना आहे हे लक्षात असू द्यावे. बाकी गुरुंची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. भगवंताप्रती आपला कसा दृढ होईल हेच ते पाहात असतात. आपल्या प्रापंचिक समस्या त्यांच्या चरणीं दृढ झाल्यावर आपोआपच मार्गी लागतात. त्यांना सांगायची गरजच लागत नाही, पण त्यांच्याविषयी तेवढी श्रद्धा आणि निष्ठा आपल्या मनात असली पाहिजे. आपल्याबरोबर ते असतातच, फक्त आपली श्रद्धा आणि निष्ठा ते सतत तपासून पाहातात. आपल्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक प्रसंगी ते आपली परीक्षा पाहात असतात, आपली "निष्ठा" कुठे डळमळत तर नाही ना! त्यामुळे सदैव त्याचे स्मरण करून आयुष्यात घडणा-या प्रसंगांना सामोरे जावे. आपला सर्व भार आपल्या निष्ठेप्रमाणे ते घेतातच. फक्त आपलं आचरण, विचार यांना आपणच सांभाळायचं आहे. ते कुठेही, केव्हांही गैर असता कामा नये. आपल्या आचरणांतून आपले "गुरू" इतरांना समजले पाहिजेत. इतकं जर जमलं तर गुरू आपल्यावर कृपा करतीलच. त्यांना आपल्याकडून "काय" हवं आहे हे ज्या दिवशी आपल्याला कळेल आणि आपले आचरण आपण त्याप्रमाणे सुधारू त्यादिवशी आपण गुरुचरणीं खरे स्थिर झालो असं समजायला हरकत नाही.
*** श्री गुरुदेव दत्त ***
-----------------------------------------------