Marathi Quote in Poem by Nilima Dighe

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

आईची गाथा
काय वर्णाची तिच्या आई पणाची गाथा
जी आहे जननी अवघ्या जगाची माता ||
तीचे कुटुंब हेच तीचे संपूर्ण विश्व असते
या विश्वात ती स्वतः चे अस्तित्व विसरून जाते ||
तीची अपुर्ण स्वप्ने ती तिच्या मुलांच्या डोळ्यात बघते
मुले यशस्वी व्हावीत म्हणून रात्रंदिवस कष्ट करते ||
कोणाला काय हवे, नको फक्त तिलाच माहीत असते
तिला काय हवे, नको कोणालाही माहीत नसते ||
तिच्या कलागुणांना कधीही वाव मिळत नाही
कारण स्वतः कडे बघायला तिला वेळच मिळत नाही ||
स्वतःच्या सर्व जबाबदाय्रा ती व्यवस्थीत पार पाडते
आई असलेल्या या बाईला सांगा कोण शाबासकी देते?
मुले मोठ्या पदावर गेली की ही माउली धन्य होते
आईचे अवघे जीवन मुलांना समर्पित असते
आईचे अवघे जीवन मुलांना समर्पित असते ||||||

Marathi Poem by Nilima Dighe : 112030671
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now