प्रेमकविता : वर्षाव प्रेमाचा
प्रेम हे पहिल्या पावसासारखे असावे,
पहिल्या प्रेमाचा तो ओलावा,
पहिल्या भेटीचा तो शहारा,
पहिल्या नजरेतला तो गारवा,
आणि पहिल्या पावसाच्या मातीतला सुगंध पसरावा सारा,
सारे काही वाटे नवे, इंद्रधनुष्य आणि कोकिळचे गाणे,
मी तर बावरी होईल राधा, प्रेमाच्या या रिमझिम पावसा,
प्रेमाच्या या पहिल्या वहिल्या पावसाचे मोल नाही कशातही,
प्रेम हे जिवंत राहुदे नेहमी, पडता पहिला पाऊस जेव्हाकधी…