प्रेमकविता : प्रेम
प्रेमाचं एवढं काय ?
असा प्रश्न होता प्रेमात पडण्याआधी,
पण शेवटी पडले मी त्या प्रेमात
आणि प्रेमच सगळं काही हे उमगलं मला माझं,
हे प्रेम होतं फक्त माझं त्याच्याशी
अबोल, एकटं, मनात खोलवर लपूनशी,
पाहत होते दुरून त्याला रोज
तुकड्यांनी जोडत होते मनात माझ्या त्याचं माझं छोटं घर,
त्याचा चेहरा हाच होता माझा आरसा,
त्याचा आवाज हेच माझं गाणं,
सजणं - नटणं हा तर केवळ बहाणा,
माझं तू होऊन विसरले मला मी,
तूच झालास आता माझं सारं जीवन हे...