Marathi Quote in Poem by prerana Devendra wagh

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

कवितेचे नाव मन एक बाजार 🥰🤝🤝🤝

काय करावं कधी हसावसं वाटतं, त्यातच त्यात मनात कुठेतरी दुःख येऊन बसतं.

काय कमाल आहे म्हणा मनाची, कधी अश्रू स्वरूपे रडतं तर कधी हसूस्वरूपी हसत.

एक वेगळाच बाजार चालतो या मनात
प्रत्येक भावनेची ऐकावी लागते बात.
यामध्ये जीव मात्र पडतो गोंधळात.
काय करावं मात्र मनाला कळत यात.

शेवटी मात्र एकच पर्याय उरतो
मेंदू येऊन भावनांची वजाबाकी करतो.
सर्व भावनांचा खेळ तो मांडतो आणि मग त्यावर विचार तो करतो


उपाय काहीतरी भेटतो त्यातून मनालाही शांत वाटतं मग अंतकरणातून. मनालाही मग आनंद मिळतो आणि भावनांचा हा बाजार येथेच सरतो.

शेवटी आनंद अश्रू भरून मन मेंदूला म्हणत.
तुझ्या साथीने माझा कार्य हे सोपं होऊन जातं.

मेंदू म्हणतो मनाला हाच फरक उरतो तू नेहमी भावनांचा विचार करतोस, आणि गोंधळात पडतो.
आणि मी मात्र माझ्या बुद्धीने विचार करतो आणि हे भावनेचं कोड येथेच मोडतो.

बरोबर आहे मित्रा तुझं तुझ्याशिवाय मी अपूर्ण.
आपल्या दोघांची मैत्री करते आयुष्याला संपूर्ण
येऊण मन मेंदूला म्हणतं आपल्या मधून कोणीच नाही जेष्ठ .
विचार करून म्हणतो तूच आहे श्रेष्ठ.



ही कविता फक्त कविता नव्हे तर आपल्याला शिकवते की भावनां चा विचार करणं महत्त्वाचं असतं पण मग नेहमीच भावनांच्या गोंधळात गोंधळून राहण्यापेक्षा मेंदूची मदत घेतली तर नेहमी आपण यशस्वी होऊ शकतो. 🥰💫💫🤝💯💯
स्वरचित कविता प्रेरणा देवेंद्र वाघ

Marathi Poem by prerana Devendra wagh : 112023934
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now