मराठी साहित्याचा ध्रुवतारा
सह्याद्रीच्या कड्याकड्यातून घुमतो जिचा नाद,
माय मराठी देते साऱ्या विश्वाला ही साद!
गदिमांच्या ओळीत जेव्हा गीत रामायण उमटते,
तेव्हा मराठीची थोरवी साऱ्या विश्वात चमकते.
कुसुमाग्रजांच्या 'कणा' मधून, कणा उभा राहतो,
मराठीच्या साहित्यात, इतिहास सारा वाहतो.
पु.लं. च्या मिश्किल विनोदात, हसते माझी भाषा,
वपुंच्या साध्या शब्दांत, जगण्याची नवी आशा.
विंदांच्या प्रज्ञेत अन् बुद्धीचा तो थाट,
मराठी साहित्याची त्यांनी, कोरली नवी वाट.
पाडगावकरांच्या प्रेमगाणी, सुरांचा तो खेळ,
शब्दाशब्दांत मांडला त्यांनी, भावनांचा मेळ.
बा. भ. बोरकरांच्या सुरांत, निसर्गाचा हा गंध,
मराठीच्या सौंदर्याशी, जोडला त्यांनी अनुबंध.
बहिणाबाईंच्या ओवीत, या मातीचा तो वास,
संसाराचे सार सांगत, दिला जगण्याचा प्रवास.
,अनंत कवी, लेखक अन् साहित्यिकांची ही खाण,
ज्यांच्या प्रतिभेने राखला, मराठीचा अढळ मान
नव्या युगाची नवी गाणी मराठीत गाऊ,
अभिजात मराठीचा झेंडा अभिमानाने मिरवू.