भविष्य....
मी ओंजळीत साठवावे..म्हणते हे क्षण..
आपुलकीचे...स्नेहाचे..आणि....
एकमेकावरच्या..सहजसुंदर प्रेमाने बांधलेले..हे क्षण....!
सहवासाचे.....गप्प्पा गोष्टींचे.आणि.. एकमेकांवरच्या विश्वासाचे..हे क्षण..!!
पण बघ ना....वाळुच्या कणांसारखे...
.हळुच ओंजळीतुन निसटतायत ते....
मी ऐकलेय रे....क्षणांना म्हणे शापच असतो..उडुन जाण्याचा..
एखाद्या कुपीतल्या अत्तरासारखा...!!!
बराच काळ त्याचा सुगंध मात्र दरवळत रहातो...मागे..
आणी मग कुपीच जाउन पडते..अडगळीत..!!!!
आपल्या ही या क्षणांचे..भविष्य असेच असेल का रे???
-----------------------------------------