छत्रपती शिवाजी महाराज जन्माआधीचे महाराष्ट्र !
महाराष्ट्र म्हणजे नेमके काय?
तर महाराष्ट्र म्हणजे एक महान असे राष्ट्र आहे पण वास्तवतः छत्रपती शिवाजी राजेंच्या जन्माआधी ना महाराष्ट्राला महान असण्याला अर्थ होता ना स्वतःचे राष्ट्र असण्याला अर्थ होता
महाराष्ट्र म्हणजे लाखो मराठ्यांचे अपूर्ण असलेले इच्छा महाराष्ट्र म्हणजे लाखो मराठ्यांच्या स्वप्नांनी स्वतःच्या राष्ट्रपती दिलेली प्राण होती आहे महाराष्ट्र म्हणजे लाखो करोडो लोकांच्या नजरेत आणि नसानसात असलेली एक आग आहे.
महाराष्ट्राचे आधीची स्थिती!!
बहुतेक महाराष्ट्रावर आदिलशाही निजामशाही व दख्खनी सुलतानांची सत्ता होती त्यांच्या महाराष्ट्रावर असलेला सत्तेमुळे त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जातीय धर्म असलेल्या लोकांवर अक्षरशः कुत्र्यासारखे अत्याचार केले. स्वतःचं असलेलं राज्य त्या लोकांना परकं होतं अनेक मराठा सरदार मुघलांच्या सेवेत त्यांच्या दरबारात अगदी गुलामासारखे राबत होते . शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्न यावर शेतकऱ्यांचा हक्क नसून मुघलांचा हक्क होता. महाराष्ट्राच्या माय बहिणींच्या अब्रूवर बन आली होती आणि हे सगळं होतं असताना कोणी काही करू शकत नव्हते.
त्यात लहानपणापासून स्वराज्याची आस व अत्याचारापासून महाराष्ट्राला सुटका मिळवून द्यायचीच ही आग डोळ्यात भरून अगदी शास्त्रात आणि शस्त्रात पारंगत असलेली माऊली म्हणजे जिजाबाई. यांचे भोसले कुटुंबामध्ये शहाजीराजे यांच्यासोबत विवाह झाले. जिजामातांनी शिवरायांना लहानपणापासून चांगला संस्कारांची ओढ लावली आणि त्यांच्यासारखेच त्यांनाही शास्त्रात आणि शस्त्रात पारंगत केले.
त्यात छोट्याशा सात वर्षाच्या वय असलेल्या बाळाने त्याचाही समोर उभे राहून एक प्राण घेतले. ते प्रण होते 'स्वराज्याचे'आणि हे फक्त त्यांनी बोलून नाही तर त्यांच्या कृत्यात उतरवून दाखवले. त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी इतिहास रचायला सुरुवात करून एक गड जिंकला आणि त्याला सुवर्ण असे नाव दिले ते म्हणजेच 'तोरणगड'.
'तोरण' म्हणजे कुठल्याही शुभ कामाला किंवा कार्याला केलेली सुरुवात असते.
शिवाजी राजांचा एक सर्वात महत्त्वाचा गुणवैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही स्त्रियांचा अपमान केला नाही व स्वराज्याचाच नाही तर इतर जातीय व मुघलांच्या स्त्रियांवर कधी अत्याचार होऊ दिला नाही.
खूप गर्व वाटतो ऐकताना की माझे राजे एकमेव त्या काळातील असे राजे होते की त्यांच्या दरबारात कधीच कुठली स्त्री नाचली नाही.
त्यांच्या नसानसात स्त्रियांचा आदर, लाखो मराठ्यांची अपूर्ण असलेली इच्छा, व डोळ्यात स्वराज्याची आग होती. ती आग डोळ्यात भरून ते स्वप्नपूर्तीची वाट चालत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न इसवी सन सोहळा 16 मे 1640 रोजी सईबाईंशी झाले. सईबाई ह्या संभाजी राजांच्या आई होत्या व छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ पटना होत्या: सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई ,सावकारबाई ,लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई व सगुनाबाई .
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून त्यामध्ये सुमारे 111 किल्ले बांधले आणि 49 किल्ल्यांचे दागदोजी केली आणि त्यांचा संपूर्ण जीवनात अखेरच त्यांनी सुमारे 240 किल्ले ताब्यात केले होते.
महाराज फक्त पन्नास वर्षे जगले पण ते जितके जगले ते फक्त त्यांच्या रयतेसाठी.
"तेहतीस कोटी देवांच्या आधी हिंदवी स्वराज्याचा दैवताला,
महाराष्ट्रावर भगवा फडकविणारा सिंहाला,
करोडो तोफांचा आणि लाखो मानांचा ,
यात साडेतीनशे वर्षापैकी प्रत्येक क्षणाचा,
सह्याद्रीच्या रांगांचा,
महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या श्वासांना,
मानाचा मुजरा "🚩
जय जिजाऊ ,जय शिवराय, जय महाराष्ट्र...
~Tanaya patil
हा मी माझ्या आयुष्यात असलेला पहिला ब्लॉग आहे. काही चुकी झाल्यास मला माफ करा 😄