Marathi Quote in Blog by Fazal Esaf

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

Dated- 9.5.2025 - Railway Station. Platform 5

"एक बिस्किटाचं विश्व"
(काही क्षण... जे काळाच्या ओघात अढळ ठरतात)

स्टेशनच्या कोपऱ्यात, धुरकट जगात एक छोटा जीव बसलेला होता.
शर्टाच्या फाटलेल्या घडीतून त्याचे कोवळे हात बाहेर डोकावत होते –
त्याच हातात होतं ते एक बिस्किट.
एकच. पण त्या एका बिस्किटात त्याचं पूर्ण बालपण सामावलं होतं.

डोळे चमकत होते – काहीतरी अनमोल गवसल्यासारखे.
आपण जसं पहिल्यांदा आईच्या हातून प्रसाद घेतो,
तसं त्याने ते बिस्किट धरलं होतं – भक्तीभावानं,
न जवळ कुणी होता, न मागणं.
फक्त मिळालं, म्हणून साजरं झालं.

शेजारीच त्याची नानी बसलेली होती –
केस पूर्ण पांढरे… काळाच्या सावल्यांनी रंगवलेले.
ते केस काही वृद्धत्वाचं लक्षण नव्हते,
ते अनुभवाचं वस्त्र होतं –
काळजीनं, उपासानं, आणि संसाराच्या झुरणंनं विणलेलं.

आणि त्या मागे… एक शांत चेहरा –
त्याची आई.
वयाच्या २५व्या वर्षी,
चेहऱ्यावर ४५व्या वर्षाच्या रेषा.
शृंगार नव्हता तिच्या चेहऱ्यावर, पण कष्टांची राख होती.
मग तीही सौंदर्याचंच दुसरं नाव नव्हे काय?

त्या तिघांचं जग फार मोठं नव्हतं –
पण त्या एका बिस्किटात
त्यांनी एक उत्सव साजरा केला होता.
उपासमारपणाची सवय, आणि तरीही हास्याचा गंध…

Marathi Blog by Fazal Esaf : 111978307
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now