कधी कधी,
काही चेहरे आपले वाटतात…
काळजाला हलकेच स्पर्शून जातात,
जणू जुना श्वास कुठूनतरी परत आलाय.
ते बोलतात, ऐकताना वाटतं —
हा आवाज माझ्या आठवणींचा आहे.
पण मग एक क्षण येतो —
जिथे नातं भूकंपासारखं ढासळतं,
नि कळतं…
आपलेपण हे फक्त एक भास होतं.
जसं धुंदीत चालत रहावं पावसात,
आणि कळावं की आपण एकटेच होतो.
पण ओल मात्र कुणीतरी मागे सोडून गेल्यासारखी वाटते…