मी माझ्यासाठी
कुठे तरी दूर समुद्र किनारी
मी असावे,
समुद्राच्या किनारी मी आणि माझे मन
निस्वार्थ भावणे ने स्वतः गुंतूनी जावे,
हवेच्या स्पर्शाने मन फुलूनी यावे
डोळे मिटूनी निसर्गाला पहावे,
कुठे तरी दूर समुद्र किनारी
मी असावे,
स्वतः चे अस्तित्व काय आहे हे विसरुनी
अल्लड वाऱ्यचा दिशेने फिरावे
कुठे तरी दूर समुद्र किनारी
मी असावे....