“सबब
माझ्या वर खूप “जीव ..आहे तुझा
माहीत आहे मला
पण तुझ्या सबबी तर संपत च नाहीयेत
सकाळी फोन केला तुला
“वाजत च राहतो ..
मग मेसेज येतो
अग कीती गडबड सकाळची
वेळ च नाही झाला फोन उचलायला
दुपारी निवांत वेळी बोलावे वाट्ते पण ..
तुझ्या त्या मिटींग्स
तुझ्या ऑफिसचे प्रोब्लेम
तुला तर डबा पण खायला वेळ नसतो
संध्याकाळी मात्र उचलतोस तु फोन
पण तुझा चिडलेला आवाज .
अग कीती ट्राफिक आहे
कसे बोलणार तुझ्याशी आतां .
रात्रीचा वेळ तर
फक्त तुझ्या “कुटुंबां साठीच असतो ना ..!
रविवार असतो तसा निवांत ..
पण सकाळ पासून तुझे मेसेज वर मेसेज असतात फक्त
भाजी आणायला जातोय् .
मुलांना क्लास ला सोडायचे आहे
........
दुपार तर माझ्याच हातून निसटून जाते
संध्याकाळी ..
आता पाहुणे आहेत
मुलांना बाहेर घेवून जातोय आता
वगैरे वगैरे मेसेज ..च फोन वर धडकत असतात
असेच कीती तरी दिवस संपत असतात ..
तुझ्या वर रागावत नाही मी कधीच ..
पण आता मीच शोधतेय “सबब ..तुला फोन न करण्याची !!
वृषाली