खूपच अवघड असते
लोकांची मने सांभाळणे
प्रत्येकाचा स्वभाव
प्रत्येकाचा बदलता मूड
बोलायचे असते एक
आणि पोहोचते वेगळेच
अशावेळी समजावणे
आणि समजून घेणे
अवघड असते सगळेच
त्यातल्या त्यात
पिढ्यातली दरी
वाढत जाते क्षणोक्षणी
कुणी कुणाला
समजून सांगायचे
अवघड होत जाते
जगणे दिवसेंदिवस