जागर घडू दे जीवन जगण्याचा
खेद नसुदे मनाला सुटल्या क्षणांचा
आहेत पुढे मार्ग जगण्याचे
विसरुदे मार्ग भरकटलेपनाचे
काही उदास वारे असतील याक्षणी
बेधुंद पाऊसधारा असतील उद्याच्या
जागर घडू दे जीवन जगण्याचा
भास फक्त हा निराशेचा
कधीही हा न संपणारा
आशावाद असता मना
मग का प्रश्न थांबण्याचा?
जागर घडू दे जीवन जगण्याचा
अग्रलेख हा तुझ्याच जन्माचा
ह्याच मंचाचा,ह्याच दिवसाचा
मग उशीर का उद्यासाठीचा?
हे लक्ष्यभेद दिवसाचे
असतात आपुल्याच जीवनाचे
हे कर्मभोवरे सत्याचे
असतात आपुल्याच परीश्रमाचे
घे गुंतवूनी ह्या परीभाषेला
नाही मार्ग अर्धवट रस्त्यांचा
सोडोनी जावो आप्तजन तुजला
हा लढा आहे तुझ्याच विकासाचा
जागर घडू दे जीवन जगण्याचा
ज्ञानाची मशाल हाती असताना
का विचार अंधाराचा?
उदय होऊ दे नव्या कल्पनांचा
मग प्रकाश पडेल तुझ्याच यशाचा
पुन्हा एकदा जागर घडू दे
तुझ्याच जीवन जगण्याचा.
ओंकार जाधव