माणूस
ओरबाडणे माहीत त्याला
देण्याची वॄत्ती हरवून गेली
कलियुगाचा महिमा आहे
माणूस स्वार्थी झाला आहे
बघणे स्वतःच्या पायापुरते
नव्या जगाची झाली रीती
विश्वास रसातळा गेला आहे
माणूस स्वार्थी झाला आहे
गोड बोलून कापतात गळे
फक्त लुटायचे लागले चाळे
लोभाने हरेक बरबटला आहे
माणूस स्वार्थी झाला आहे
प्रल्हाद दुधाळ