Marathi Quote in Jokes by Geeta Gajanan Garud

Jokes quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

प्रमिलाच्या मुलाचं नुकतच लग्न झालं होतं नं नव्या सुनबाईला बघायला प्रमिलाताईंच्या महिलामंडळातील मैत्रिणी येणार होत्या.

सुनबाईच्या हातचा चहा प्रमिलेलाच मुळात आवडत नव्हता पण असं तिला सांगायचं कसं..त्या गुपचूप पीत किंवा स्वतः करून पीत.

लाडक्या मैत्रिणींसाठी मात्र त्यांनी स्वतः आलं,वेलदोडे, गवती चहा(माती नि धोंडे) घालून चहा केला व सुनबाईला सांगितलं की चहा आणायला सांगितला की घेऊन यायचा.

झालं. प्रमिलाताई तयारबियार होऊन दिवाणखान्यात बसल्या. सख्या आल्या. एकेक ही एवढी. सगळ्या सोफा,कोच..कुठेकुठे बसल्या.

प्रमिलाने स्माईलबिईल दिलं नं सूनबाईस साद घातली. सूनबाई जरा चहा टाक आणि परत गप्पाष्टकं सुरू..अय्या किती सुंदर साडी गं..कितीला घेतली..... हे नेकलेस होय..ह्यांनी आणलय मस्कतहून ( खरंतर मस्जिद बंदरहून). एक मैत्रीण म्हणाली, तुझ्या सुनबाईस बोलाव पाहू. लग्नात नीटसं बघताच नाही आलं. काय ते फोटोग्राफर नुसते बोवळत होते अधेमधे.

प्रमिलाताईने सुनबाईस हाकारलं,"सुनबाई, चहा

घेऊन ये बरं."

पण सुनबाई एक नाही की दोन नाही.

प्रमिलाताई जरा जोरात साद घालू लागल्या तोच सुनबाई बाहेर प्रवेशत म्हणाली,"काकू, तुम्हीच मघा सांगितलत..चहा टाक..मी टाकला. सिंकपण साफ केलं. आता टाकलेला चहा परत कसा आणू?"

प्रमिलाताईंच्या तोंडाचा आ काही केल्या मिटेना.

--गीता गरुड.

Marathi Jokes by Geeta Gajanan Garud : 111883625
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now