#kavyotsav2
घाव प्रेमळ गोधडीचे
सट्टा सट्टा डोक्यात तिच्या धोपटणं
पाषाणावर फाट फाट निर्दय आपटणं
आईग !!तरी किती मायेनं तिचं थोपटणं
लय भारी गोधडी तुझं ते हळुवार कुशीत घेणं ...
लांब लचक ती सुई, तुझ्या पोटात भोसकणं
सहन तर करतच असतेस नेहमीच उसवणं
रक्त बंबाळ झालीस तरी काय गोड हसणं
उब तुझी हवी हवीशी आवडतं तुझं कुरवाळनं ...
जाणवे तूझ्यात आईचा स्पर्श आणि आजीचं बोलणं
हसतच लगेच माफ करतेस लेकरांचं ते तुडवणं
थंडी जाता कपाटात श्वास रोकुन निवांत पड़ून राहनं
तुझा शत्रू असे गारवा तरीही परत त्याचीच वाट पाहनं ...
अजब तुझं घाव सोसून सार्वां प्रेमऊब देनं
मतलबी सजीवांना हा धडा , निर्जीवांचं हे वागनं...
ईश्वरी